scorecardresearch

राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 10 Jul 1951
वय 73 Years
जन्म ठिकाण भभौरा, उत्तर प्रदेश
राजनाथ सिंह यांचे चरित्र

राजनाथ सिंह हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहे. तसेच ते देशाचे संरक्षणमंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांचा जन्म १० जुलै १९५१ रोजी उत्तर प्रदेशातील भभौरा येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील राहिलेले आहेत.

Read More
राजनाथ सिंह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राम बदन सिंह
आई
सावित्री सिंह
शिक्षण
एम.एस.सी. फिजिक्स
व्यवसाय
राजकीय नेते

राजनाथ सिंह न्यूज

शांघाय को-ऑपेरेशन ऑर्गनायझेशन परिषदेच्या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर चीनने हे विधान केले आहे. (Photo: @rajnathsingh/X)
India-China: “हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे, पण…”, राजनाथ सिंग यांच्या दौऱ्यानंतर सीमा मुद्दा सोडवण्यासाठी चीनचा पुढाकार

India-China Border: “सीमेचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे आणि तो सोडवण्यासाठी वेळ लागत आहे,” असे माओ यांनी बीजिंगमध्ये पत्रकारांना सांगितले.

अन्वयार्थ : शांघाय (अ)सहकार्य! (Photo Credit - AP)
अन्वयार्थ : शांघाय (अ)सहकार्य!

शांघाय सहकार्य परिषदेच्या नावातच ‘शांघाय’ असल्यामुळे या राष्ट्रसमूहावर चीनची छाप आणि प्रभुत्व असणार हे सुरुवातीपासूनच स्पष्ट होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
भारत-चीनमध्ये सीमेवरील शांततेबाबत चर्चा

तणाव निवळणे, सैन्यमाघारी, सीमा व्यवस्थापन आणि सीमेची आखणी या मुद्द्यांवर विविध स्तरांवर दोन्ही देशांत चर्चा सुरू ठेवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेसाठी चीनला गेलेल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. (Photo: @rajnathsingh/X)
India-China: “भारताला चीनशी संघर्ष…”, राजनाथ सिंह आणि चिनी संरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर चीनचे निवेदन

India-Chana: या भेटीपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले होते की, दुर्मिळ खनिजे आणि नैसर्गिक संसाधनांबाबत भारत आणि आणि चीनमध्ये चर्चा सुरू आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
file photo
एससीओ’ सदस्यांना संरक्षणमंत्र्यांचे खडेबोल; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्याने निवेदनावर स्वाक्षरीस नकार

संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यासही त्यांनी नकार दिल्यामुळे परिषदेचा समारोप संयुक्त जाहीरनाम्याशिवाय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पाकिस्तानला सुनावले.
Rajnath Singh: पाकिस्तानचा मित्रराष्ट्र चीनमध्ये जाऊन राजनाथ सिंह यांनी दहशतवादावरून काढली खरडपट्टी

Rajnath Singh at SCO meet: चीनमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवादावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले.

राजनाथ सिंह यांनी म्हटले की, "दहशतवादाचे कोणतेही कृत्य गुन्हेगारी आणि अन्याय्य आहे, मग त्याचा हेतू काहीही असो, तो कुठेही, केव्हाही आणि कोणीही केला असो."(Photo: @DefenceMinIndia/X)
पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसलेल्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यास भारताचा नकार; चीनमध्ये राजनाथ सिंहांची कठोर भूमिका

Pahalgam Attack: एससीओ शिखर परिषदेदरम्यान, राजनाथ सिंह यांनी दहशतवादावर कडक संदेश दिला आणि एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

प्रातिनिधिक छायाचित्र
पाकिस्तानच्या संरक्षण अंदाजपत्रकात २० टक्के वाढ

भारताने सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर मोहिमेमध्ये पाकव्यात काश्मीर आणि दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले केले होते. यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते.

 संरक्षणमंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौदलाने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले.
पाकिस्तानचा दहशतवादाचा खेळ संपुष्टात; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

दहशतवादाविरुद्ध नागरिकांची सुरक्षा करण्याचा भारताचा हक्क आज जग मान्य करीत आहे. जगातील कुठलीही शक्ती भारताला हे करण्यापासून रोखू शकत नाही,’ असे संरक्षणमंत्री म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाचे कौतुक केले. (Photo - Rajnath Singh / X)
“… तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं विधान

Defence Minister Rajnath Singh: ऑपरेशन सिंदूर ही फक्त लष्करी कारवाई नव्हती तर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताने उचललेले आक्रमक पाऊल होते, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनी आज आयएनएस विक्रांतला भेट दिली. (PC : Rajnath Singh/X)
पाकिस्ताननं परत ‘नापाक’ हरकत केली तर यावेळी कदाचित भारतीय नौदल ‘ओपनिंग’ करेल; संरक्षणमंत्र्यांचा इशारा

Rajnath Singh on Pakistan : राजनाथ सिंह म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय नौदलाने कोणताही गाजावाजा न करता केलेल्या कामगिरीद्वारे प्रत्येक भारतीयाला प्रभावित केलं आहे”.

 भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील नागरिकांबद्दल मोठे विधान केले आहे. (फोटो - इंडियन एक्सप्रेस)
Rajnath Singh on POK : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे ‘पीओके’बद्दल महत्त्वाचे विधान; म्हणाले, “स्वेच्छेने एक दिवस…”

Rajnath Singh on POK : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील नागरिकांबद्दल मोठे विधान केले आहे.

संबंधित बातम्या