-
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या या केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आले आहेत.
-
जम्मू-काश्मीरमधील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहेत.
-
हजारो वार करून भारताला रक्तबंबाळ करण्याचा पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत.
-
मात्र आमच्या देशाच्या अखंडता आणि एकतेला तोडण्याचा प्रयत्न झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी दिला.
-
बारामुल्ला येथे सुरक्षा दलांना संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला.
-
आपले शेजारी राष्ट्र नेहमीच भारतविरोधी कारवाया करत आहेत. या देशालाही दहशतवादाची झळ बसली असूनही भारतातील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून वारंवार केले जात आहेत.
-
भारताचे अखंडत्व आणि एकता यांच्यावर वार करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न आहेत. मात्र असे प्रयत्न झाल्यास भारतील सैन्यदलाकडून योग्य आणि चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
-
जम्मू-काश्मीरमध्ये आधी मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले व्हायचे. (Photo : PTI)
-
मात्र सैन्य दल, सीमासुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या अथक प्रयत्नांमुळे सध्या दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झाली आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
-
आपले सुरक्षा दलाने देशासाठी मजबूत सुरक्षा कवच तयार केले आहे, जो कोणी ते तोडण्याचा प्रयत्न करतो, तो स्वत:ला रक्तबंबाळ करतो.
-
कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपले सैन्यदल तत्पर असून आपल्या सैन्यावर राष्ट्राचा अपार विश्वास आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्र्यांनी सैन्य दलाचे कौतुक केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : राजनाथ सिंह / ट्विटर)

Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”