मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करता येईल असे उद्दिष्ट्य ठेवलेला समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडत असून संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर या महामार्गामुळे चांगला परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा असून यातील ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होत आहे. समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेची समाजमाध्यमात चांगलीच चर्चाही रंगली.Read More
समृद्धी महामार्ग त्याच्या निर्मितीपासून तर त्यावरून वाहतूक सुरू झाल्यानंतरसुद्धा कायम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. येथे माणसांचे अपघात अजूनही थांबलेले नाहीत,…
समृद्धी महामार्गावर नवीन पोचमार्ग तयार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( एमएसआरडीसी ) दोन पर्यायांवर सकारात्मक हालचाली सुरू…