scorecardresearch

सोनिया गांधी

सोनिया गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 9 Dec 1946
वय 78 Years
जन्म ठिकाण इटली
सोनिया गांधी यांचे चरित्र

सोनिया गांधी (Sonia Gandhi) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. सध्या त्या राज्यसभेवरील खासदार आहेत. १९९८ साली त्या काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९९९ साली त्या अमेठी येथून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं नेतृत्व केले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. २००४, २००९,२०१४ व २०१९ मध्ये त्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये त्यांनी हे पद सोडलं आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९८ ते २०१७ या कालावधित त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे.

Read More
सोनिया गांधी यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
दिवंगत राजीव गांधी
मुले
राहुल गांधी, प्रियंका गांधी
नेट वर्थ
₹ ११,८२,६३,९१६
व्यवसाय
राजकीय नेत्या

सोनिया गांधी न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (छायाचित्र पीटीआय)
सोनिया गांधी यांचं नाव निवडणूक यादीत दोनदा? भाजपाने काय केला आरोप?

BJP on Sonia Gandhi : सोनिया गांधी या भारताच्या नागरिक नसतानाही त्यांचं नाव दोनवेळा मतदान यादीत आलं होतं, असा गंभीर आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

भाजपाने आरोप केला आहे की, सोनिया गांधींचे नाव बेकायदेशीरपणे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते. (Photo: inc.in And Amit Malviya/X)
Vote Chori: “भारताचे नागरिक व्हायच्या आधीच सोनिया गांधींचे मतदार यादीत नाव”, राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांना भाजपाचे प्रत्युत्तर

Vote Chori Allegations: या मुद्द्यावर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे, तर दुसरीकडे खासदार अनुराग ठाकूर यांनी एक पत्रकार परिषद घेतली.

मल्लिकार्जुन खरगे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Mallikarjun Kharge : “..आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडलीच नाही”; मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलेला किस्सा चर्चेत

Mallikarjun Kharge : विजयपूर येथील कार्यक्रमात मल्लिकार्जुन खरगेंनी हा किस्सा सांगितला जो चांगलाच चर्चेत आला आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. या हाय-प्रोफाइल प्रकरणाची सुनावणी सीबीआयचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्यासमोर सुरू आहे. (Photo: Reuters)
National Herald case: “दोन हजार कोटींच्या मालमत्तेसाठी…”, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीचा गंभीर आरोप

National Herald case: अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी असे म्हटले की, गांधी कुटुंबाच्या जवळच्या सहकाऱ्यांना एजेएलचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि पैसे गुपचूप हस्तांतरित करण्यासाठी फसवे व्यवहार केले गेले होते.

गाझामधील विध्वंस व इराणमध्ये विनाकारण होत असलेले हल्ले पाहूनही नवी दिल्लीने त्यावरील मौन सोडलं पाहिजे, असं गांधी यांनी म्हटलं आहे. (फोटो सौजन्य पीटीआय)
सोनिया गांधी यांच्या इराणवरील ‘त्या’ लेखामुळे वादंग का उठला? भाजपाचे नेते कशामुळे आक्रमक झाले?

Sonia Gandhi Latest News : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी इस्रायल-इराण संघर्षादरम्यान पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा लेख लिहिला. हा लेख प्रसिद्ध होताच राजकीय वादंग उठला आहे.

मध्य-पूर्व आशियातील तणावाबाबत सोनिया गांधी यांनी एक लेख लिहिला आहे. (PC : PTI)
“इस्रायल-इराण संघर्षावर भारताचं मौन चिंताजनक”, सोनिया गांधींची टिप्पणी; ट्रम्प-नेतान्याहूंबद्दल म्हणाल्या, “त्यांचा इतिहास…”

Israel Iran War Sonia Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या, “इस्रायलसह स्वतंत्र पॅलेस्टाइनची कल्पना करणाऱ्या शांततापूर्ण द्वीपक्षीय तोडग्याचं भारताने प्रदीर्घ काळापासून समर्थन केलं आहे. मात्र, नवी दिल्लीने आपल्या तत्वनिष्ठ वचनबद्धतेचा त्याग केल्याचं दिसतंय”.

सोनिया गांधी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी उपचारासाठी दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi Health Update: पोटातील दुखण्यामुळे खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी(संग्रहीत फोटो-इंडियन एकस्प्रेस)
National Herald Case : “सोनिया आणि राहुल गांधींनी आर्थिक अफरातफर करुन १४२ कोटी रुपये कमवले”, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा दावा

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने दिल्लीतल्या एका न्यायालयामध्ये हा दावा केला आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? न्यायालयाने बजावली नोटीस, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
National Herald Case : सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? न्यायालयाने बजावली नोटीस, नेमकं कारण काय?

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना या नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित सुनावणीसाठी नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे.

सोनिया, राहुल गांधींना नोटीस बजावण्यास नकार; नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरण ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
सोनिया, राहुल गांधींना नोटीस बजावण्यास नकार; नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधींसह इतरांना तात्पुरती नोटीस बजावण्यास नकार दिला.

संबंधित बातम्या