scorecardresearch

उद्धव ठाकरे Videos

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
Sanjay Raut gave a reaction on Best Election
Sanjay Raut on Best Election: पतपेढी निवडणूक निकालाबाबत माहिती नाही, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

बेस्ट पतपेढी निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या पॅनलचा एकही उमेदवार जिंकला नाही. त्यामुळे मनपा निवडणुआधी ठाकरे बंधूंसाठी हा धक्का…

Uddhav Thackeray praises the artists of folk narrative
Uddhav Thackeray: “हा कार्यक्रम नाही, ही जाणीव”; उद्धव ठाकरेंकडून फोक आख्यानच्या कलाकारांचं कौतुक

मार्मिक साप्ताहिकाच्या ६५व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी मुंबईत पार पडला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संजय…

Uddhav Thackeray Request Cji Bhushan Gavai
Uddhav Thackeray Request to CJI: मतांची चोरी राहुल गांधींनी उघड केली तरी..; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मार्मिकच्या ६५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावाली होती. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. दिल्लीत भटक्या कुत्र्यांचा…

Sanjay Raut gave a explanatioon on Raj Thackeray & Uddhav Thackeray Yuti
राज- उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत राहुल गांधींना कल्पना दिली का? राऊतांचं थेट उत्तर, “त्यांना आक्षेप..”

Sanjay Raut on Raj Thackeray & Uddhav Thackeray Yuti: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांना आज माध्यमांनी…

sanjay raut criticized devendra fadanvis over maharashtra politics
मिस्टर फडणवीस पुळका नको..; ठाकरेंच्या शेवटच्या रांगेचा प्रसंग चर्चेत!

Sanjay Raut vs Devendra Fadnavis: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांना ७ ऑगस्ट रोजी रात्री जेवणासाठी…

उद्धव ठाकरेंना INDIA च्या बैठकीत शेवटची रांग; देवेंद्र फडणवीसांनी गोड शब्दात ऐकवलं
उद्धव ठाकरेंना INDIA च्या बैठकीत शेवटची रांग; देवेंद्र फडणवीसांनी गोड शब्दात ऐकवलं

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांना ७ ऑगस्ट रोजी रात्री…

Uddhav Thackerays criticism of Deputy Chief Minister Eknath Shinde
Uddhav Thackeray: “ते एवढे महान नाहीत”; एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंची टीका

Uddhav Thackeray: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील…

Sanjay Raut gave a reaction on Raj Thackeray at Matoshree on the occasion of Uddhav Thackerays birthday
Sanjay Raut: उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर; संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut: शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काल (२७ जुलै) वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज…

Uddhav Thackeray gave a advice to CM Devendra Fadnavis
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “ते निती वगैरे सगळ्या गोष्टी मानत असतील तर..”

Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांवर…

What was the interaction with Uddhav Thackeray during the photo session at Vidhan Bhavan Neelam Gorhe gave a reaction
Neelam Gorhe: विधानभवनात फोटो सेशनदरम्यान उद्धव ठाकरेंशी काय संवाद झाला? नीलम गोऱ्हे म्हणाल्या…

Neelam Gorhe: पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानभवनाच्या पाऱ्यांवर आदित्य ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावर आता नीलम गोऱ्हे…

ताज्या बातम्या