Discount On Nissan Magnite: निसान मोटर्सने त्यांच्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. जर तुम्ही कमी किंमतीमध्ये चांगली SUV कार घ्यायचा विचार करत असाल, तर तुम्हाला निसान मोटर्सच्या या ऑफरचा नक्की फायदा होईल. या ऑफरमुळे निसान मोटर्सच्या Nissan Magnite ही SUV कार खरेदी करताना ६२,००० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. यामध्ये लॉयल्टी बोन्सस, कॉर्पोरेट डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि एक्सेसरीज अशा ऑफर्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ऑनलाइन बुकींग केल्यावरही काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे. सध्या या कारची एक्स शोरुम किंमत ५,९९,९०० रुपये इतकी आहे.
या महिन्यामध्ये निसान मोटर्स मॅग्नाइट एसयूवीवर १०,००० रुपये एक्सेसरीज, १०,००० रुपये लॉयल्टी बोनस, २०,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि १०,००० रुपयेपर्यंतचे कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. ऑनलाइन बुक केल्यावर २ हजार रुपायांची सूट मिळणार आहे. ही कार खरेदी करण्यासाठी बॅंककडून ६.९९ टक्के व्याजावर कर्ज दिले जाणार आहे. ही ऑफर फक्त या महिन्यापुरती मर्यादित आहे.
Nissan Magnite मधील खास फीचर्स
निसान मोटर्सच्या या SUV कारमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनद्वारे 100hp पावर आणि १६० न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करता येतो. याव्यतिरिक्त या चारचाकी गाडीत 1.0 लीटर पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. या पेट्रोल इंजिनमुळे 71hp पावरसह 96Nm टॉर्क जनरेट करणे शक्य होते. निसान मॅग्नाइटमध्ये 5-स्पीड मैनुअल/ ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही आहे. तसेच यात रियर पार्किंग सेंसर, एयर प्यूरिफायर, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, 7-इंच TFT स्क्रीन, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, वायरलेस चार्जिंग, स्पीड सेंसिंग डोर लॉक, HBA डुअल एयरबॅग्स असे अनेक अत्याधुनिक फीचर्स आहेत.
निसान कंपनीने काही दिवसांपूर्वी Nissan Magnite चे Geza Edition लॉन्च केले आहे. या नव्या एडिशनची किंमत (एक्स शोरूम किंमत) ही ७.३९ लाख रुपये आहे.