Hero MotoCorp ही भारतातील लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीच्या उत्पादनांना भारतीय ग्राहकांंचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो. आपल्या ग्राहकांसाठी हिरो कंपनीने नुकतीच Hero HF Deluxe या बाईकचे स्पेशल Canvas Black edition लॉन्च केले आहे. तसेच आता ही बाईक नेक्सस ब्लू नेक्सस ब्लू, कँडी ब्लेझिंग रेड, हेवी ग्रे-ब्लॅक आणि ब्लॅक-स्पोर्ट्स रेड अशा रंगांमध्ये पाहायला मिळणार आहे. रंगाचे हे पर्याय लवकरच ग्राहकांना निवडता येणार आहेत.

हिरो एचएफ डिलक्सच्या नव्या कॅनव्हास एडिशनमध्ये All-black theme चा वापर करण्यात आला आहे. ब्लॅक-आउट इंजिन, अलॉय व्हील्स, मफलर, फ्रंट फोर्क आणि ग्रॅब रेल असे पार्ट्स मॅट ब्लॅक रंगाने रंगवले असल्याचे पाहायला मिळते. बाजूच्या पॅनल्सवरील 3D HF Deluxe emblem मुळे बाईकचा लूक आणखी क्लासी वाटत आहेत. यामध्ये सेल्फ आणि सेल्फ i3S व्हेरिएंट्समधील ट्यूबलेस टायर्ससारख्या अनेक स्टॅन्डर्ड फीचर्सचा समावेश आहे. बाईकसह एक USB चार्जर Accessory म्हणून दिला जाणार आहे.

A Ukrainian vlogger tasted vada pav for the first time in Goa She documented her experience in a video on Instagram watch ones
VIDEO: परदेशी व्लॉगरला ‘वडापाव’ची भुरळ! ‘तिने’ जाणून घेतली ४० वर्षांपासून दुकान चालवणाऱ्या विक्रेत्याची गोष्ट
rbi repo rate unchanged
रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट ‘जैसे थे’, कारण काय? जीडीपी वाढीचा अंदाज का वर्तविण्यात आला?
AIESL recruitment 2024
AIESL Recruitment 2024 : एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये होणार ‘मेगा’ भरती! पाहा माहिती
Girls hair was pulled After seeing the video
अगं पोरी, जरा हळू! आधी केस ओढले, बोचकारलं अन्… पार्कमध्ये तरुणींचा राडा VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “शाम्पूची जाहिरात”
Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding Dress Code And Food Menu
अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलीवूड कलाकार दिसणार ‘या’ ड्रेसकोडमध्ये; पाहुण्यांसाठी जेवणाचा मेन्यू आहे खूपच खास
Video of Mumbai restaurant employee cleaning drain with frying net goes viral, hotel issues clarification
” बदनामी करण्यासाठी…”, मुंबईच्या हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याने झाऱ्याने केले गटार साफ,Viral Videoबाबत मालकाचा खुलासा
१ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम लागू होणार! आता RTO परीक्षेची सक्ती नाही; जाणून घ्या हे नवे नियम
Malicious Calls Claiming All Your Mobile Numbers
“दोन तासात तुमचा मोबाईल नंबर होईल बंद?”असे कॉल आले तर घाबरू नका, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

आणखी वाचा – जपानला मागे टाकत भारत बनला Automobile क्षेत्रातला तिसऱ्या क्रमांकाचा देश; नितीन गडकरी म्हणाले, “२०२८ पर्यंत आपण..”

या स्पेशल एडिशनमध्ये 97.2cc एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, OHC, BS6 (OBD-II कंप्लायंट) PFI इंजिनसह ‘XSens टेक्नॉलॉजी’ आहे. यामुळे बाईकला 5.9kW आणि 8.05Nm क्षमता प्राप्त होते. हिरो एचएफ डिलक्सच्या कॅनव्हास एडिशनमध्ये 9.6-लिटरची इंधन टाकी असून त्याचे कर्ब व्हेट हे 112kg इतके आहे. यात 733 मिमी लांब सीट, २-स्टेप अ‍ॅडजस्टेबल सस्पेंशन आणि अलॉय व्हील आहेत. शिवाय ट्यूबलेस टायर, साइड स्टँड इंडिकेटर, क्रोम लेग गार्ड आणि टो गार्ड अशा सुविधा देखील आहेत.

आणखी वाचा – Honda Cars India च्या विक्रीदरात तब्बल ४३ टक्क्यांनी घट; मे २०२३ मध्ये झाली फक्त ४,६६० युनिट्सची विक्री, पाहा आकडेवारी

या बाईकसह पाच वर्षांची वॉरंटी आणि पाच Free Services दिल्या जाणार आहेत. व्हेरिएंटनुसार Hero HF Deluxe ची माहिती देण्यात आली आहे.

  • Hero HF Deluxe Drum Kick Cast – ६०,७६० रुपये
  • Hero HF Deluxe Drum Self Cast – ६६,४०८ रुपये
  • Hero HF Deluxe i3S Drum Self Cast – ६७,९०८ रुपये
  • Hero HF Deluxe Gold Black – ६७,२०८ रुपये

(किंमतीबाबतची माहिती दिल्लीच्या एक्स-शोरूमद्वारे मिळवण्यात आली आहे.