Priyanka Gandhi on BJP over Rahul Gandhi Ravan Poster: काँग्रेसने ४ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक पोस्टर पोस्ट करत पंतप्रधान मोदींचा उल्लेख ”सर्वात मोठे खोटारडे” आणि दुसऱ्या एका पोस्टरमध्ये ”जुमला बॉय” असा केला. यानंतर आता भाजपाने त्या पोस्टला प्रत्युत्तर देत राहुल गांधींचे रावणाच्या रूपातील पोस्टर शेअर केले. यामुळे आता भाजपा आणि काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर सुरू झाले आहे. राहुल गांधींचा रावणरूपी फोटो पोस्ट केल्याने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयराम रमेश म्हणाले, ”भाजपाच्या अधिकृत X हँडलद्वारे राहुल गांधी यांना रावण म्हणून दाखवले जाणाऱ्या चुकीच्या ग्राफिक्सचा खरा हेतू काय आहे? काँग्रेच्या माजी अध्यक्षयांविरुद्ध हिंसाचार करणे व चिथावणी देणे हाच या पोस्टरमागचा स्पष्ट उद्देश आहे. ज्यांच्या वडिलांची आणि आजीची हत्या भारताचे विभाजन करू इच्छित असलेल्या शक्तींनी केली होती.”

हेही वाचा : “…म्हणून गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली”, दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

”पंतप्रधानांनी आपण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा रोज खोटे बोलून देणे हा एक भाग आहे. मात्र त्यांच्याच पक्षाकडून याप्रकारचा द्वेषयुक्त कंटेंट तयार करणे हे पूर्णपणे अस्वीकार्यच नाही तर अधिक धोकादायक देखील आहे. या गोष्टींना आम्ही घाबरत नाही.” असे आपल्या X वरील पोस्टमध्ये जयराम रमेश म्हणाले.

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक पोस्टर पोस्ट केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने राहुल गांधींचे रावणरूपातील एक पोस्टर पोस्ट केले होते. त्या पोस्टरला ‘भारत संकटात आहे’ असे हेडिंग देण्यात आले होते.

भाजपाने पोस्ट केलेल्या फोटोवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील X वर प्रत्युत्तर दिले आहे.

”आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि जे. पी. नड्डा तुम्ही राजकरण अणि वादविवाद कोणत्या स्तराला नेऊ इच्छिता? आपल्या पक्षाच्या अधिकृत X हॅंडलवरून ज्याप्रकारच्या हिंसक आणि चिथावणीखोर पोस्ट केल्या जात आहेत , त्याला तुमची सहमती आहे का? तुम्ही प्रामाणिकपणाची शपथ घेऊन फार वेळ झालेला नाही. तुम्ही दिलेली वचने विसरलात का?” असे थेट टीका प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि जे. पी, नड्डा यांच्यावर केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jairam ramesh priyanka gandhi congress post pm modi biggest liar then bjp posted on rahul gandhi post as new age ravan poster war tmb 01