scorecardresearch

Premium

“…म्हणून गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली”, दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागून आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde on Fire in Goregaon at Parking
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगला लागलेल्या आगीचं कारण सांगितलं. (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबईतील गोरेगावमध्ये जय भवानी या इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. यात आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी शिंदेंनी आगीमागील कारण सांगत मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करेल, असंही जाहीर केलं. ते शुक्रवारी (६ ऑक्टोबर) दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “गोरेगावमध्ये एसआरएची जय भवानी इमारत आहे. त्या इमारतीत आग लागली आहे. मी सातत्याने महापालिका आयुक्त, पोलीस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. मी त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंगमध्ये कागद आणि कापडाचे गठ्ठे होते. त्यामुळे आग लागली असं प्राथमिक स्तरावर निदर्शनास आलं आहे.”

Student organizations protest against Governor Arif Mohammad Khan in Kerala
केरळच्या राज्यपालांचे रस्त्यावरच दोन तास ठाण; ‘एसएफआय’च्या निदर्शनांनंतर केंद्राकडून झेड सुरक्षा
Mallikarjun Kharge writes to Mamata Banerjee requesting security for Bharat Jodo Nyaya Yatra
‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरक्षा पुरवावी! मल्लिकार्जुन खरगे यांची ममता बॅनर्जीना पत्र लिहून विनंती
Shiva Vazarkar murder
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर याची धारदार चाकूने हत्या, चंद्रपूर शहरात तणावाचे वातावरण
ration distribution mediator beaten Kalyan
कल्याणमध्ये शिधावाटप मध्यस्थाला लोखंडी सळईने मारहाण

“मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत”

“झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्यांचा या आगीत मृत्यू झाला आहे त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेन, असाही निर्णय घेण्यात आला आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

https://x.com/mieknathshinde/status/1710162455698227254

हेही वाचा : VIDEO: मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू, तर अनेकजण जखमी

धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? एकनाथ शिंदे म्हणाले…

धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, “आजपासून निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. आयोग योग्य तो निर्णय घेईन. लोकशाहीत ज्या बाबींची दखल घेतली जाते त्याप्रमाणे निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईन.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde comment on fire at building parking in goregaon pbs

First published on: 06-10-2023 at 11:32 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×