ICC Test Rankings Indian Players: आयसीसीने कसोटी क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. तिन्ही प्रकारात टॉप-१० मध्ये भारतीय खेळाडू आहेत तर गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडू पहिल्या क्रमांकावर आहेत. याशिवाय अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना बंपर फायदा झाला आहे. जेडेन सील्स आणि जेसन होल्डर या वेस्ट इंडिजच्या जोडीने आयसीसीच्या नव्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याचबरोबर आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी अव्वल स्थान कायम राखले आहे.

हेही वाचा – Gautam Gambhir: गौतम गंभीरने निवडली ऑल टाईम इलेव्हन; पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना मिळालं स्थान

ICC ने जाहीर केली ताजी कसोटी रॅकिंग

वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेडेन सील्सने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ९ विकेट्स घेतल्या. त्याने क्रमवारीत १३ स्थानांची मोठी झेप घेतली असून ताज्या क्रमवारीत १३व्या स्थानावर पोहोचला आहे. हे त्याचे आतापर्यंतचे सर्वोत्तम रँकिंग आहे. त्याचवेळी त्याचा सहकारी गोलंदाज जोमेल वॅरिकनने २ स्थानांनी झेप घेत ५२व्या स्थानावर तर शामर जोसेफने ११ स्थानांनी झेप घेत ५४व्या स्थानावर झेप घेतली आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज विआन मुल्डरने २७ स्थानांची मोठी झेप घेत ६५वे स्थान मिळविले आहे. याशिवाय अनुभवी खेळाडू जेसन होल्डरनेही २ स्थानांची झेप घेतली आहे. आता तो ७व्या स्थानावरून ५व्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा – BCCI Earnings: IPL 2023 मुळे BCCI मालामाल, तब्बल ५,१२० कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई, पण GST तब्बल…

Men’s Test Batter Rankings: फलंदाजीत भारताचे तीन खेळाडू टॉप-१० मध्ये

फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूट ८७२ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ८५९ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा बाबर आझम ७६८ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर, न्यूझीलंडचा डॅरिलल मिशेल ७६८ रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ७५७ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे. तर सहाव्या स्थानी रोहित शर्मा, आठव्या स्थानी यशस्वी जैस्वाल तर १०व्या स्थानी विराट कोहली आहे.

हेही वाचा – Robin Uthappa: “माझी जी अवस्था झाली होती त्याची लाज वाटत असे”, रॉबिन उथप्पाने उलगडला तो अवघड काळ

Men’s Test Bowler Rankings: भारताचा गोलंदाज पहिल्या स्थानी कायम

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही टीम इंडियाचा स्टार रविचंद्रन अश्विन गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी कायम आहे. अश्विनचे ​​रेटिंग ८७० गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूड ८४७ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत ८४७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी पॅट कमिन्स ८२० रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आणि कागिसो रबाडो ८२० रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Jay Shah ICC Chairman: जय शाह आता ICC चे अध्यक्ष होणार, ‘या’ व्यक्तीने शर्यतीतून घेतली माघार

Men’s Test All Rounders Rankings: अष्टपैलू खेळाडू म्हणून सर जडेजा पहिल्या स्थानी

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही रवींद्र जडेजा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून पहिल्या स्थानावर आहे. रवींद्र जडेजा ४४४ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. या यादीत भारतीय खेळाडू रविचंद्रन अश्विनही दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याचे रेटिंग गुण ३२२ आहेत. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन ३१० रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानी, इंग्लंडचा जो रूट २८४ रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर २७० रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.