MI vs KKR : पोलार्डने अंपायरकडे फेकला बॉल; वाइडवरूनही झाला वाद, पहा VIDEO

मुंबईचा किरॉन पोलार्ड डावातील दहावी ओव्हर टाकण्यासाठी आला, त्यावेळी बॉल थेट अंपायरला लागला.

Kieron Pollard Accidently Hits Umpire While Bowling
(फोटो सौजन्य – ट्विटर)

मुंबई इंडियन्स, आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ, लीगच्या १५ व्या हंगामात आतापर्यंतच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. या मोसमात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा हा पहिला संघ ठरला आहे. सोमवारी डीवाय पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सकडून मुंबईला ५२ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या नावावर आयपीएलच्या इतिहासातील आणखी एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. आयपीएल २०२२ मधील ११ सामन्यांमध्ये मुंबईचा हा नववा पराभव होता.

पण सोमवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यात एक जबरदस्त क्षण पाहायला मिळाला. मुंबईचा किरॉन पोलार्ड डावातील दहावी ओव्हर टाकण्यासाठी आला, त्यावेळी त्याच्या हातातून बॉल सुटला आणि तो थेट अंपायरला लागला.

MI vs KKR : रोहित आऊट की नॉट आऊट? अंपायरच्या निर्णयावरुन मोठा गोंधळ

जेव्हा पोलार्ड दहाव्या षटकाचा पाचवा बॉल टाकत होतो तेव्हा लगेचच तो क्रीजवर आला आणि बॉल टाकायला लागला. त्यावेळी त्याच्या हातातून बॉल सूटन थेट अंपायरला लागला. अंपायरने ताबडतोब आपली जागा बदलली आणि हे पाहून सगळे हसले. त्यानंतर पोलार्डने अंपायरची माफी मागितली, तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माही या संपूर्ण प्रकरणावर हसताना दिसला. कारण हे चुकून घडले आणि अंपायरला चेंडू इतका जोरात लागला नाही.

मात्र, यानंतर काही वेळातच पोलार्डचा दुसऱ्या अंपायरशी वाद झाला. डावाच्या १३व्या षटकात नितीश राणा पोलार्डच्या चेंडूवर फलंदाजी करत होता, त्यावेळी तो ऑफ-साइडमध्ये खेळू लागला, तेव्हा पोलार्डने चेंडू थोडा अधिक बाहेर फेकला. अंपायरने त्याला वाइड ठरवले, पण किरॉन पोलार्डला हा निर्णय आवडला नाही. तो अंपायरकडे बघत उभा राहिला, त्यानंतर जेव्हा मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवला गेला तेव्हा किरॉन पोलार्डने अंपायरला त्यालाही पाहण्यास सांगितले आणि दोघांनी काही संवाद साधला.

IPL 2022 : सलमान खानला ओळखतो का? रबाडाने दिले मजेशीर उत्तर; म्हणाला, “मी फक्त…”

दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ९ बाद १६५ धावा केल्या. नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी ४३ धावांची खेळी खेळली. याशिवाय अजिंक्य रहाणेने २५ आणि रिंकू सिंगने नाबाद २३ धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने पाच आणि कुमार कार्तिकेयने दोन खेळाडूंना बाद केले. मुंबई इंडियन्सला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि अवघ्या ११३ धावांवर सर्व बाद झाले.

आयपीएल २०२२ मध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून काही विशेष करू शकला नाही. रोहितने आतापर्यंत ११ सामन्यांत १८.१८ च्या सरासरीने १९८ धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितचा स्ट्राइक रेट १२५ आहे आणि सर्वोत्तम धावसंख्या ४३ धावा आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 mi vs kkr kieron pollard accidently hits umpire while bowling abn

Next Story
IPL 2022 : सलमान खानला ओळखतो का? रबाडाने दिले मजेशीर उत्तर; म्हणाला, “मी फक्त…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी