आयपीएल २०२३चा फायनल २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. चेन्नई सुपर किंग्ज फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून क्वालिफायर-२ मध्ये एंट्री घेतली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धचा हा सामना जिंकणारा संघ आयपीएल २०२३ च्या विजेतेपदासाठी चेन्नई सुपर किंग्जसोबत लढणार आहे. दरम्यान, फायनलमध्ये आमचा सामना मुंबईशी व्हावा, असे मला वाटत नाही, असे चेन्नईच्या एका माजी क्रिकेटपटूने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू आणि सध्याचा गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्होने मुंबई इंडियन्सविरुद्ध अंतिम फेरीत खेळण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. क्वालिफायर १ मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध १५ धावांनी विजय मिळविल्यानंतर ब्राव्होने एका मुलाखतीत सांगितले की, “मला मुंबई इंडियन्सची भीती वाटते आणि आम्ही अंतिम फेरीत मुंबईशी खेळू नये अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे.” माहितीसाठी की, मुंबई इंडियन्सने लखनऊला हरवून क्वालिफायर २ मध्ये स्थान मिळवले आहे, जिथे त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे.

मुंबई फायनलमध्ये येऊ नये- प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो

प्रदीर्घ काळ चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो याने अंतिम सामन्यापूर्वी म्हटले आहे की, “मला आमचा सामना मुंबई इंडियन्सचा सामना करायचा नाही. होय, माझा मित्र किरॉन पोलार्डलाही याची जाणीव आहे.” तो पुढे म्हणाला की, “विनोद करण्याव्यतिरिक्त मी संघांना ऑल द बेस्ट म्हणत आहे.” मात्र, अंतिम फेरीत कोण प्रवेश घेणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही. आपण याची वाट पाहू या. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.”

हेही वाचा: IPL2023: विराट कोहलीच्या फॅन्सच्या ‘या’ कृतीवर सौरव गांगुली भडकला, दादा म्हणाला, “तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर…”

मुंबई-चेन्नई फायनलमध्ये ४ वेळा आमनेसामने आले आहेत

विक्रमी ५ वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि ४ वेळा आयपीएल ट्रॉफी विजेते चेन्नई सुपर किंग्ज हे चार वेळा फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स संघ ३ वेळा जिंकू शकला आहे तर चेन्नई सुपर किंग्सने फक्त १ जिंकला आहे. चेन्नई संघाने २०१०च्या फायनलमध्ये मुंबईला पराभूत करून ट्रॉफी जिंकली होती, तर मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१९ मध्ये चेन्नईचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 former chennai player is scared of mumbai indians said i do not want us to play the final with that team avw