RCB Match Ticket Price in Bangalore : आयपीएल २०२४ च्या हंगामाला २२ मार्च पासून सुरुवात झाली असून जवळपास निम्मा हंगाम संपला आहे. कारण आयपीएल २०२४ मधील ३१ सामने पार पडले आहे. मात्र, हा हंगाम आरसीबीसाठी चांगला राहिला नाही. त्यांनी आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यात त्यांना फक्त एकच विजय मिळवता आला आहे. तो संघ सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. असे असूनही आरसीबीच्या चाहत्यांचा जोश कमी झालेला नाही. याचा पुरावा म्हणजे आरसीबीच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची किंमत. आरसीबीच्या घरच्या सामन्यांच्या तिकिटांची किंमत ५० हजार रुपयांवर पोहोचली आहे.

बंगळुरूमधील सामन्याच्या तिकिटांची किंमत ५० हजारांच्या पुढे –

इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, लखनऊ सुपर जायंट्सच्या घरच्या सामन्यासाठीची सर्वात स्वस्त तिकीट किंमत ४९९ रुपये होती. तथापि, जर एखाद्या चाहत्याला शेवटच्या क्षणी आरसीबीच्या सामन्यासाठी सर्वोत्तम सीट बुक करायची असेल, तर त्याला ५२,९३८ रुपये खर्च करावे लागतील. चाहत्यांची मागणी पाहून आयपीएल फ्रँचायझीही जास्तीत जास्त नफा मिळावा म्हणून तिकिटांच्या दरात वाढ करत आहेत.

फ्रँचायझी त्यांच्या आवडीनुसार किंमत ठरवतात –

बीसीसीआयने फ्रँचायझींना तिकिटाची किंमत स्वतः ठरवण्याचा अधिकार दिला आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजन मनचंदा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ‘फ्रँचायझी त्यांच्या आवडीनुसार किंमत ठरवतात. आम्ही त्यांना पायाभूत सुविधा तयार करून पुरवतो. तिकीट दराशी आमचा काहीही संबंध नाही.’

हेही वाचा – कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी

बंगळुरूमध्ये होणाऱ्या सामन्याच्या तिकीटाची सर्वात कमी किंमत २,३०० रुपये आहे. हे इतर सर्व संघांच्या स्वस्त तिकिटांपेक्षा जास्त आहे. बंगळुरूमधील पहिल्या सामन्यासाठी फॅन्स टेरेसची किंमत ४,८४० ते ६,२९२ रुपये अशी होती, तर कॉर्पोरेट स्टँडची किंमत ४२,३५० ते ५२,९३८ रुपये होती.

संघ सर्वोच्च कमी किंमत सर्वात जास्त किंमत
आरसीबी रु. २,३०० रु. ५२,९३८
एलएसजी रु. ४९९ रु. २०,०००
केकेआर रु. ७५० रु. २८,०००
एमआय रु. ९९० रु. १८,०००
जीटी रु. ४९९ रु. २०,०००
सीएसके रु. १,७०० रु. ६,०००
डीसी रु. २,००० रु. ५,०००
आरआर रु. ५०० रु. २०,०००
एसआरएच रु. ७५० रु. ३०,०००
पीबीकेएस रु. ७५० रु. ९,०००

फ्रँचायझींना तिकिटाची पूर्ण रक्कम मिळत नाही –

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ म्हणाले, ‘तिकीट काळ्या बाजारात चढ्या किमतीत विकल्या जातात, ज्याचा आम्हाला काहीच फायदा नाही. त्या अनुषंगाने आपल्याला बघावे लागेल. स्टेडियमच्या सुविधा वाढल्या असल्याने बाजारातील मागणी लक्षात घेऊन आम्ही किंमत निश्चित केली आहे. तिकिटावर २८ टक्के जीएसटी आणि २५ टक्के करमणूक कर आकारला जातो. आम्हाला तिकीटाचे पैसे फार कमी मिळतात.’

हेही वाचा – IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरला १२ लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण?

स्टार खेळाडूंच्या नावांचाही पडतो प्रभाव –

पंजाब किंग्जच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘तुम्ही मुंबईत खेळत असाल, तर तुम्हाला ५००० रुपयांना तिकीट मिळेल पण चंदीगडमध्ये ते १००० रुपये आहे. मागणी आणि पुरवठ्यानुसार किंमत ठरवली जाते. मुंबईत एक चाहता सामना पाहण्यासाठी ५००० रुपये देईल पण चंदीगडमध्ये असे होणार नाही. जर एमएस धोनी, विराट कोहली किंवा रोहित शर्मा खेळत असतील, तर तिकीटाची किंमत जास्त असेल. परंतु राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद किंवा लखनऊ सुपरजायंट्सच्या सामन्यात असे दिसून येत नाही. मात्र, धोनी आणि कोहली यांच्यातील सामन्यांची सर्व तिकिटे विकली जातात.