Shreyas Iyer fined 12 lakhs slow over rate : आयपीएल २०२४ मधील ३१ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २ गडी राखून पराभव केला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या उच्च धावसंख्येच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाने २२३ धावांची मोठी धावसंख्या फलकावर लावली. यामध्ये अष्टपैलू सुनील नरेनचे महत्त्वाचे योगदान होते, ज्याने १०७ धावांची उत्कृष्ट शतकी खेळी केली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलरच्या नाबाद शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या पराभवानंतर केकेआर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला आणखी एक धक्का बसला आहे. त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल २०२४ च्या ३१ व्या सामन्यात केकेआरचा राजस्थान रॉयल्सने दोन गडी राखून पराभव केला. या सामन्यात जोस बटलरने ६० चेंडूत नाबाद १०७ धावा करत या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘स्लो ओव्हर रेटशी संबंधित आयपीएल आचारसंहितेच्या अंतर्गत हंगामातील हा त्याच्या संघाचा पहिला गुन्हा होता, त्यामुळे अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.’ राजस्थान रॉयल्सचा सात सामन्यांमध्ये सहावा विजय होता, तर केकेआरला सहा सामन्यांमधला दुसरा पराभव स्वीकारावा लागला.

Virat Kohli emotional post on Instagram
IPL 2024 : विराटची राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर भावनिक पोस्ट; RCB च्या चाहत्यांचे आभार मानत म्हणाला…
Ipl 2024 rajasthan royals vs kolkata knight riders 70th match prediction
IPL 2024 : राजस्थान विजयपथावर परतण्यास उत्सुक; गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या कोलकाताशी आज सामना
Hardik Pandya banned from 1st match of ipl 2025
IPL 2024 : BCCI ची हार्दिक पंड्यावर मोठी कारवाई! पुढील हंगामातील पहिल्याच सामन्यात खेळण्यावर घातली बंदी
Action against Samson for slow over rate
IPL 2024 : सलग तिसऱ्या पराभवानंतर संजू सॅमसन नाराज; म्हणाला, ‘माझ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की जर…’
Virat Umpire's Verbal fight during RCB vs DC match
RCB vs DC : लाइव्ह मॅचमध्ये विराट कोहलीने अंपायरशी घातला वाद, जाणून घ्या काय होतं नेमकं कारण?
Sanju Samson broke Shane Warne's record
CSK vs RR : संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी रचला इतिहास! शेन वॉर्नला मागे टाकत केला खास पराक्रम
MS Dhoni announcement on way
CSK vs RR : एमएस धोनीचा चेन्नईत शेवटचा IPL सामना? CSK च्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांची वाढली धाकधूक
Rajasthan Royals Owner Hit Ross Taylor In IPL 2011
IPL 2024 : राहुलच नाही तर रॉस टेलरही संघ मालकाच्या रोषाचा ठरलाय बळी, शून्यावर आऊट झाल्यानंतर उचलला होता हात

जोस बटलरचे रेकॉर्डब्रेक शतक –

जोस बटलरने १०७ धावांची नाबाद खेळी साकारत आयपीएलमधील ७ वे शतक झळकावले, ज्यात त्याने ९ चौकार आणि ६ षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १७८.३३ होता. त्याचबरोबर या हंगामातील त्याचे हे दुसरे शतक आहे. या शतकासह बटलरने अनेक विक्रमही मोडीत काढले. बटलरने सर्वाधिक आयपीएल शतकांच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये ६ शतके झळकावली होती. विराट कोहलीनंतर बटलर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. आयपीएल २०२४ मध्ये झळकावलेल्या एका शतकासह, कोहलीने या लीगमध्ये आतापर्यंत ८ शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित!

राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत अव्वल –

राजस्थान रॉयल्स संघ आतापर्यंत आयपीएल २०२४ मधील ७ सामन्यांतील ६ विजयांच्या जोरावर १२ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचवेळी, कोलकाता नाइट रायडर्स ६ सामन्यात ४ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरचे ८ गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोघांच्या नावावर ६ सामन्यांत ४ विजय आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ ७ सामन्यांत केवळ एका विजयासह तळात आहे.