11 December 2018

News Flash

Live: Lalbaugcha Raja Visarjan Sohala 2017

मुंबईतील ‘लालबागचा राजा’ म्हणजे अनेक सेलिब्रिटींसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान! गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात. गेल्या चार वर्षांपासून ‘लालबागचा राजा’चे ऑनलाईन दर्शन घेण्याची सुविधा ‘लोकसत्ता ऑनलाईन’तर्फे जगभरातील भाविकांना देण्यात येत आहे. अनेक भाविकांनी या सुविधेचे कौतुक केले असून, यामुळे घरबसल्या आम्हाला आमच्या ‘राजा’चे कधीही दर्शन घेता येते, या स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यंदाही संपूर्ण गणेशोत्सवात दिवस-रात्र तुम्ही ‘लालबागचा राजा’चे ‘ऑनलाईन’ दर्शन घेऊ शकणार आहात. गणपती बाप्पा मोरया…
– लोकसत्ता ऑनलाईन टीम