बदलत्या जीवनशैलीचा विचार करता आपल्या शरीराकरिता ड्रायफ्रुट्स खाणे अत्यंत गरजेचे आहे. ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या  प्रमाणात पौष्टिक घटक असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याकरिता उपयोगी पडतात. म्हणूनच शरीर निरोगी आणि चांगलं ठेवण्यासाठी व्यक्तीनं ड्रायफ्रुट्सचं सेवन करायला हवं, असा सल्ला अनेकदा डॉक्टर्स देत असतात. वृद्ध असोत की लहान मुले, सर्व वयोगटातील लोकांना कोणत्याही समस्येमध्ये आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. ड्रायफ्रुट्समध्ये असलेल्या विविध आवश्यक पोषकतत्वांमुळे व्यक्तीला रोगप्रतिकारशक्ती मिळण्यास मदत होते.

बदाम, अक्रोड, काजूप्रमाणेच चिलगोजा हे सुकामेवा आहे. हे पाइन झाडाच्या फळाच्या आत असलेले बी आहे. चिलगोजा पौष्टिकतेने समृद्ध आहे. चिलगोजाला ‘पाइन नट्स’देखील म्हणतात. हे खूप महाग ड्रायफ्रुट आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच बाजारात त्याची मागणी जास्त आहे. चिलगोजाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला कोणते फायदे मिळू शकतात, या विषयावर आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

चिलगोजा एक सुपरफूड आहे. शरीरात प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता असल्यास, डॉक्टर ही चिलगोजा खाण्याची शिफारस करतात. सर्व ड्रायफ्रुट्समध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फायबर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, तर चिलगोजा जीवनसत्त्वे, फायबर आणि प्रथिने यांचा उत्तम स्रोत आहे. चिलगोजाचे शरीराला कोणते फायदे होतात ते आज आपण जाणून घेऊयात. 

(हे ही वाचा : तुम्ही जिवंत मासे गिळल्याने दमा बरा होऊ शकतो? डाॅक्टरांचे स्पष्ट उत्तर; म्हणाले… )

हेल्दी फॅट्स : चिलगोजामध्ये भरपूर मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे तुमच्या हृदयासाठी फायदेशीर असतात.

प्रथिने : यामध्ये प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे ते शाकाहारी लोकांसाठी उत्कृष्ट पर्याय बनतात.

फायबर : चिलगोजा जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहे. फायबर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.

जीवनसत्त्वे आणि खनिजे : चिलगोजा मजबूत हाडांसाठी मॅग्नेशियम, निरोगी त्वचेसाठी व्हिटॅमिन ई आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी झिंक यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे.

चिलगोजा सेवन करण्याचे फायदे

१. कोलेस्ट्रॉल कमी करण्यात उपयुक्त

चिलगोजामध्ये टोकोफेरॉल आहे, जो एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. हे शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि हृदयरोगापासून बचाव करते.

२. हृदय निरोगी

चिलगोजा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हृदयविकार होऊ देत नाही. चिलगोजामध्ये असलेले पॉली-अनसॅच्युरेटेड फॅट्स कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयरोगांपासून संरक्षण करतात.

३. वजन नियंत्रणात

वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही चिलगोजा फायदेशीर आहे. हे ड्रायफ्रुट वजन नियंत्रणासाठीही फायदेशीर आहे. वास्तविक त्यात प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते, जे भूक कमी करण्यास मदत करते.

४. प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत  

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चिलगोजादेखील वापरला जाऊ शकतो.

बहुतेक लोक चिलगोजाचा आनंद घेऊ शकतात. तथापि मल्होत्रा म्हणतात की, काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत; त्या म्हणजे तुम्हाला कोणतीही ॲलर्जी असल्यास चिलगोजाचे सेवन करण्यापूर्वी डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या…