कडक उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त घाम येणे सामान्य आहे, कारण शरीराला थंडावा देण्याचा हा एक मार्ग आहे. पण, तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात का ज्यांना इतका घाम येतो की वारंवार कपडे बदलावे लागतात. त्वचा सतत पुसावी लागते, शरीराला दुर्गंधी येते आणि तसेच सामान्य काम करत असतानाही खूप घाम येतो. असे असेल तर तुम्हाला हायपरहाइड्रोसिस नावाचा आजार आहे. याचा अर्थ तुमच्या शरीरातील घामाच्या ग्रंथी अतिक्रियाशील आहेत. यावर दिल्लीतील साकेतमधील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे इंटर्नल मेडिसिनचे डायरेक्टर डॉ. रोमेल टिकू यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घाम ग्रंथी काय आहेत?

आपल्या शरीरात दोन प्रकारच्या घामाच्या ग्रंथी असतात. एक्रिन ग्रंथी, ज्या आपल्या शरीराच्या बहुतेक केस नसलेल्या भागांवर असतात. जसे की तळवे, तळहात आणि कपाळ. त्यानंतर एपोक्राइन ग्रंथी असतात, ज्या केसांच्या कूपांच्या जवळ आढळतात आणि मुख्यतः टाळू, बगल आणि गुदद्वाराजवळ आढळतात. एक्रिन ग्रंथींमधून निघणाऱ्या घामामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते, बाकीचे क्षार असते. एपोक्राइन ग्रंथीमधून निघणारा स्राव बहुतेक चिकट असतो, ज्यात पाणी प्रथिने आणि पोषक घटक मिसळलेले असतात. बॅक्टेरिया असलेल्या त्वचेच्या फोल्डमध्ये घाम येतो, ज्यामुळे शरीरात दुर्गंधी निर्माण होते.

जास्त घाम येण्याची कारणे कोणती?

हे प्रामुख्याने अशा लोकांमध्ये घडते, ज्यांच्या घामाच्या ग्रंथींची संख्या आणि आकार सामान्यपेक्षा जास्त आहे. म्हणूनच थोड्याशाही परिणामाने या ग्रंथी अतिक्रियाशील बनू शकतात आणि घाम जास्त निघू लागतो. उबदार, दमट तापमान, व्यायाम किंवा शारीरिक हालचालींचे तीव्र स्वरूप, हार्मोनल असंतुलन, विशेषत: रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये थायरॉईड समस्या, एपिडर्मिसमध्ये वाढलेल्या रक्त प्रवाहामुळे असे होते. यामुळे त्वचा लाल होणे, तणाव आणि चिंता अशा समस्या जाणवतात. विशिष्ट औषधांच्या दुष्परिणामांमुळेही काहीवेळा जास्त घाम येतो.

घामाचे प्रमाण तुमच्या शरीराच्या आकारमानावर आणि स्नायूंच्या वस्तुमानावरदेखील अवलंबून असते, ज्यामुळे जास्त उष्णता निर्माण होते, परिणामी घाम जास्त येतो.

लैंगिक संबंधांतून वेगाने पसरतोय ‘हा’ नवा दुर्मीळ आजार; कोणाला अधिक धोका? जाणून घ्या लक्षणे

तुम्हाला जास्त घाम येण्याची समस्या आहे याची खात्री कशी होईल?

स्टार्च आयोडीन चाचणी आहे, ज्यामध्ये घामाच्या भागावर आयोडीनचे द्रावण लावले जाते आणि त्यावर स्टार्च शिंपडला जातो. यामुळे जास्त घामाचे ठिपके निळे होतात. घाम ग्रंथींच्या जागेवर पेपर सोक्स आणि रक्त इमेजिंग चाचण्यादेखील आहेत.

जास्त घामामुळे शरीराला दुर्गंधी का येते?

घामामुळे शरीराला दुर्गंधी येत नाही, तर घामातील बॅक्टेरियामुळे दुर्गंधी येते. तुम्ही बाहेर जास्तवेळ मेहनतीचे काम करत असल्यास वारंवार कपडे बदलू शकता. शूज आणि मोजे बदला, मसालेदार अन्नाचे सेवन कमी करा आणि अधिक पाणी प्या. शक्य असल्यास एकापेक्षा जास्त वेळा अंघोळ करा.

काहीवेळा तुमचे डॉक्टर घाम येणे नियंत्रित करण्यासाठी औषधे आणि सुरक्षित डिओडोरंट्स किंवा अँटीपर्सपिरंट्स लिहून देऊ शकतात. तुम्ही रात्री झोपताना प्रिस्क्रिप्शन ग्रेड डिओडोरंट लावू शकता. यामुळे घाम नियंत्रणात ठेवता येतो, तसेच घाम शोषून घेणारे कपडे वापरा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sweating heat summer are you sweating more than others find your triggers sjr
First published on: 16-06-2024 at 19:03 IST