Kitchen Jugaad : तूप हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा भाग आहे. भारतीय जेवणात तूपाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक पदार्थांमध्ये तूपाचा आवर्जून उपयोग केला जातो. आपल्या आरोग्यासाठी सु्द्धा तूप अत्यंत फायदेशीर आहे.जे तूप आरोग्यासाठी चांगले आहे आणि तुम्ही त्याचा आहारात समावेश करताहेत, ते शुद्ध आहे की भेसळयुक्त? याविषयी तुम्ही कधी विचार केला का? तुम्हाला माहिती आहे का आणि शुद्ध तूप कसे ओळखायचे? आज आपण या विषयी जाणून घेणार आहोत. काही खास ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तूप कोणते, हे सहज ओळखू शकाल. जाणून घेऊ या. (Easy ways to the check ghee is pure or not)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हातावर घासा

तूप शुद्ध आहे की भेसळयुक्त हे जाणून घ्यायचे असेल तुम्ही हातावर तूप घासून हे ओळखू शकता. यासाठी हातावर तूप घासा जर हे तूप हातावर घासल्यानंतर लगेच विरघळत असेल तर समजायचे की हे तूप शुद्ध आहे पण विरघळण्यासाठी वेळ लागत असेल तर समजायचे की या तूपात भेसळ आहे.

गरम करा

तूप भेसळयुक्त आहे का, हे ओळखण्यासाठी तूप थोड्याप्रमाणात गरम करा. जर तूप लवकर विरघळत असेल आणि तपकीरी रंग येत असेल तर समजायचे की हे तूप शुद्ध आहे पण जर तूप गरम केल्यानंतर विरघळण्यासाठी वेळ लागत असेल आणि पिवळा रंग येत असेल तर तर समजायचे की तूप भेसळयुक्त आहे.

हेही वाचा : दही की ताक? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

पाण्याचा वापर करा

तूप शुद्ध आहे का हे ओळखण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. एक ग्लास पाणी घ्या त्यात एक चम्मच तूप टाका. जर तूप पाण्याच्या वर तरंगत असेल तर समजायचे की तूप शुद्ध आहे पण पाण्याच्या तळाशी साचून राहिले तर समजायचे तूप भेसळयुक्त आहे.

मिठाचा वापर करा

मिठाच्या मदतीने सुद्धा तुम्ही तूप शुद्ध आहे का, हे ओळखू शकता. एका भांड्यामध्ये एक चम्मच तूप टाका आणि त्यात चिमुटभर मीठ घाला आणि त्यात थोडे हायड्रोक्लोरीक अ‍ॅसिड टाका. अर्धा तासानंतर जर या तूपाचा रंग बदलला तर समजायचे की तूप भेसळयुक्त आहे पण रंग बदलला नसेल तर समजायचे की तूप शुद्ध आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen jugaad how to check purity of ghee easy ways to the check ghee is pure or not kitchen hacks ndj