बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते म्हणून धर्मेंद्र यांना ओळखले जाते. ७० च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. आतापर्यंत त्यांनी तब्बल ३०० चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. धर्मेंद्र यांचे संपूर्ण नाव धर्मेंद्र सिंह देओल आहे. मात्र, त्यांनी कधीच आपले पूर्ण नाव वापरले नाही. त्यांनी नेहमीच धर्मेंद्र हे पहिलेच नाव सगळीकडे वापरले. मात्र, आता तब्बल ६४ वर्षांनी त्यांनी आपल्या नावामध्ये बदल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांचा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात धर्मेंद्र यांची महत्त्वाची भूमिका आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, या चित्रपटाच्या क्रेडिट लिस्टमध्ये धर्मेंद्र यांच्या नावात बदल केलेला दिसून येत आहे. त्यामध्ये त्यांचे संपूर्ण नाव म्हणजे धर्मेंद्र सिंह देओल, असे देण्यात आले आहे. याअगोदर धर्मेंद्र यांनी आपले संपूर्ण नाव कधीच वापरले नव्हते. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटात त्यांचे धर्मेंद्रएवढेच नाव दिलेले असायचे. मात्र, या नव्या चित्रपटात त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, नावात बदल केल्याच्या या प्रकाराबाबत धर्मेंद्र यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

नावात बदल करण्याची धर्मेंद्र यांची ही पहिली वेळ नाही. अभिनेत्री हेमा मालिनीबरोबर लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी आपला धर्म बदलला होता. धर्मेद्र व हेमा मालिनी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. व त्यांना लग्न करायचे होते. पण धर्मेंद्र यांच अगोदरच प्रकाश कौर यांच्याबरोबर लग्न झाले होते. ते आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही देऊ इच्छित नव्हते. त्यामुळे धर्मेंद्र यांनी आपला धर्म बदलत इस्लाम धर्मात प्रवेश केला. यानंतर त्यांनी नावातही बदल करत आपले नाव दिलावर खान ठेवले. तर हेमा मालिनी यांनीही आपले नावात बदल करत आयशा बी आर चक्रवर्ती केले. त्यानंतर १९८० मध्ये दोघांनी मुस्लिम पद्धतीनुसार लग्न केले.

हेही वाचा- ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, खासगी रुग्णालयात उपचार सुरू, मुलगा अपडेट देत म्हणाला…

‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’च्या कथेबाबत बोलायचे झाले, तर या चित्रपटात क्रितीने सिफ्रा नावाच्या रोबोटची भूमिका साकारली आहे. शाहिद कपूर एक इंजिनीयर दाखविण्यात आला आहे. त्याच्या पात्राचे नाव आर्यन अग्निहोत्री आहे. आर्यन रोबोट असणाऱ्या क्रितीच्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर काय काय मजेशीर गोष्टी घडतात त्या या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हेही वाचा- अदा शर्माने नेसली आजीची ६५ वर्षे जुनी साडी; म्हणाली, “माझी आजी जेव्हा २५ वर्षांची…”

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ते गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्याबरोबर आलिया भट्ट, रणवीर सिंग, शबाना आझमी व जया बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा एक किसिंग सीन होता. चित्रपटाबरोबर या सीनचीही जोरदार चर्चा झाली होती

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharmendra changes his on screen name after 64 years of his debut dpj
First published on: 10-02-2024 at 15:59 IST