बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने दमदार कमाई केली होती. २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता. आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत. गेली बरीच वर्षं प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत होते. आता लवकरच ‘डॉन ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला गेलेला विकी कौशल गर्दीत अडकला; पोलिसांनी केली मदत, व्हिडीओ व्हायरल

मध्यंतरी शाहरुख खान या ‘डॉन ३’मध्ये दिसणार नसल्याची बातमी समोर आली होती. ती बातमी आता खरी ठरली आहे. फरहान अख्तरच्या‘डॉन ३’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या रणवीर सिंहचा दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा फर्स्ट लूकसुद्धा व्हायरल झाला होता. पण शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंहची निवड पाहून बरेच लोक नाखुश असल्याचं दिसत आहे. अनेकांनी त्याला यावरुन ट्रोलही केलं होतं. या सगळ्या प्रकारावर आता फरहाने मौन सोडत स्पष्टीकरण दिलं आहे.

फरहान म्हणाला, “चित्रपटात कोणालाही बदलण्याची माझी इच्छा नाहीये. या गोष्टींवर आम्ही अनेक वर्ष चर्चा केली आहे. मी या चित्रपटाच्या कथेला एका ठोस निर्णयपर्यंत घेऊन जाऊ इच्छित होतो. आमच्यात एकमत झालं नाही आणि परस्परांच्या संमतीने आम्ही विभक्त झालो आहोत. कदाचित हे चांगल्यासाठी झालं आहे. रणवीरबाबत बोलायचं झालं तर मी रणवीरसोबत काम करण्यास उत्सुक आहे. हा एक मोठा चित्रपट आहे. रणवीर खूप उत्साही आहे. त्याचा उत्साह आम्हाला आणखी उत्साहीत करेल.”

हेही वाचा- “…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

फरहान अख्तर ‘डॉन ३’चे दिग्दर्शन करत आहे. यापूर्वीच्या ‘डॉन’ आणि ‘डॉन २’चे ही दिग्दर्शन त्याने केले आहे. एक्सेल एंटरटेनमेंटचे रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farhan akhtar breaks silence on replacing shah rukh khan with ranveer singh in don 3 dpj