मॉडेल व अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आदिलला तुरुंगात टाकल्यानंतर राखीचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओंमधून राखीने आदिलवर गंभीर आरोप केले होते. आदिलच्या अफेअरचा खुलासा केल्यानंतर मारहाण व फसवणूक केल्याचा आरोपही राखीने केला होता. आता राखीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लाइव्ह केलं होतं. “आदिलवर इराणी महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. म्हैसूरमध्ये त्या महिलेला बोलवून आदिलने मी राखीला घटस्फोट देणार आहे तुझ्याशी लग्न करेन असं सांगितलं. मलाही ओशिवारा पोलीस ठाण्यात बोलवून सगळ्यांना सोडून फक्त तुझ्याशी संसार करणार असल्याचं आदिलने मला सांगितलं. आदिल तू प्रत्येक मुलीला फसवणं बंद कर.मी तुला घटस्फोट देणार नाही. त्यामुळे तू कोणाशीही लग्न करू शकणार नाहीस. तू माझ्याबरोबर फक्त निकाह नाही तर कोर्ट मॅरेजही केलं आहेस. त्यामुळे तू लग्न केलंस…तर मी तुझ्याविरोधात गुन्हा दाखल करेन”, असं राखी म्हणाली आहे.

हेही वाचा>> “आलियाने खूप सहन केलं आहे” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाचं वक्तव्य, म्हणाला “त्याचा मुलगा अनैतिक…”

“आदिल तू शारीरिक व मानसिक त्रास दिला आहेस. मी रोज सकाळी उठून नमाज पठण करते. कारण तू मला मुस्लीम धर्माचा स्वीकार करायला सांगितला. आदिल तू वाईट आहेस, पण मुस्लीम धर्म चुकीचा नाही. आता मला अल्लाहच ताकद देईल. मी रोज उठून सगळ्या देवांची प्रार्थना करते. त्यातूनच मला हिंमत मिळते”, असंही राखी म्हणाली आहे. राखीने या व्हिडीओतून ओशिवारा पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. “आदिलचे फोन मुंबई पोलिसांनी शोधले नाहीत. त्यांनी त्याची चौकशीही केली नाही. त्याने काय जादू केली मला माहीत नाही. पण ओशिवारा पोलिसांनी काहीच केलं नाही. माझ्यासारख्या सेलिब्रिटीला तुम्ही न्याय मिळवून दिला नाही तर सामान्य माणसांना काय न्याय मिळणार”, असं राखी म्हणाली.

हेही वाचा>> घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान राजीव सेनने पत्नी चारू असोपाच्या वाढदिवशी शेअर केले रोमँटिक फोटो, नेटकरी म्हणाले “लग्नाला खेळ…”

पुढे राखी म्हणाली, “आदिलच्या फोनमध्ये माझे व इतर अनेक मुलींचे अश्लील व्हिडीओ आहेत. ओशिवारा पोलिसांनी त्याचे फोन शोधले नाहीत. पण मला विश्वास आहे, की आता देवच त्याचे फोन शोधायला मदत करेल. आदिलचे फोन मिळाले नाहीत तर तो आमचे व्हिडीओ व्हायरल करेल. ओशिवारा पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पण म्हैसूर पोलिसांवर माझा विश्वास आहे”.

हेही वाचा>> Video: “१० वाजता कोणता योगा असतो”, ‘त्या’ व्हिडीओमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “विना मेकअपची दारू…”

राखीने आदिलविरोधात तक्रार केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला आदिलची रवानगी चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. आदिलवर म्हैसूरमध्ये इराणी महिलेकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता त्याची म्हैसूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant alleged adil khan said he offer irani women a marriage to dismiss case kak