आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त प्रसाद ओकने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला “धर्मवीर...” |shivsena aanand dighe birth anniversary dharmveer actor prasad oak shared special post | Loksatta

आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त प्रसाद ओकने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला “धर्मवीर…”

आनंद दिघेंच्या जयंती: प्रसाद ओकने शेअर केली खास पोस्ट

prasad oak post on anand dighe birth anniversary
प्रसाद ओकची खास पोस्ट. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची आज जयंती आहे. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे” हा मराठी चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली होती. त्याच्या भूमिकेचं कौतुकही करण्यात आलं होतं.

प्रसाद ओकने आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघेंच्या लूकमधील काही फोटो प्रसाद ओकने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. या व्हिडीओमधून प्रसादने आनंद दिघे यांना आदरांजली दिली आहे.

हेही वाचा>> Video:…अन् रणबीर कपूरने सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोनच फेकून दिला; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’चं यश पाहून गौरी खान झाली भावूक; सुहाना व आर्यनची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

“धर्मवीर आनंद दिघे साहेब…मन:पूर्वक अभिवादन”, असं कॅप्शन प्रसादने व्हिडीओला दिलं आहे. प्रसादच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे” चित्रपटात प्रसाद ओकसह क्षितीश दाते, गश्मीर महाजनी, श्रृती मराठे, स्नेहल तरडे, अभिजीत खांडकेकर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा>> Video: हातात दारुचा ग्लास अन् कंगना रणौतचा डान्स; पार्टीतील व्हिडीओमुळे अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले “हिंदू धर्म…”

प्रसाद ओक मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमध्ये परीक्षक आहे. प्रसाद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक व्हिडीओ व फोटो तो शेअर करताना दिसतो.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 13:55 IST
Next Story
कोकणातील डबलबारीतही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ची क्रेझ, व्हिडीओ पाहिलात का?