दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी जागतिक स्तरावर २८० कोटी कमाई केली होती. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. भारतात या चित्रपटाने १४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, श्रीतेज, अनासुया भारद्वाज, जगदीप प्रताप, जगपति बाबू या तगड्या कलाकार मंडळींनी प्रेक्षकांनी मनं जिंकली. तसंच या चित्रपटातील आयटम साँगमधून भाव खाऊन गेली ती म्हणजे श्रीलीला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाने ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘किसीक’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. तेव्हापासून श्रीलीला खूप चर्चेत आहे. ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटानंतर श्रीलीला बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘आशिकी ३’ चित्रपटात श्रीलीला कार्तिक आर्यनबरोबर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या श्रीलीलाचं नाव कार्तिक आर्यनबरोबर जोडलं जात आहे. दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच श्रीलीला लग्नाआधीच दोन मुलांची आई असल्याचं समोर आलं आहे.

१४ जून २००१मध्ये जन्मलेल्या श्रीलीलाने तेलुगु आणि कन्नड सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. श्रीलीलाने एमबीबीएस शिक्षण घेतलं आहे. २०२१मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करण्याआधी तिने ‘किस’ चित्रपटातून पदार्पण केलं. ती भरतनाट्यम नृत्यांगना आहे. श्रीलीला ही बंगळुरूच्या स्त्रीरोगतज्ज्ञ स्वर्णलताची मुलगी आहे. तिचा जन्म आई-वडील विभक्त झाल्यानंतर झाला होता. जेव्हा श्रीलीलाने दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं, तेव्हा तिला सुरपनेनी सुभाकर यांची मुलगी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं.

त्यानंतर २०२१मध्ये सुरपनेनी सुभाकर राव यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, श्रीलीला माझी मुलगी नाहीये. पूर्वाश्रमीची पत्नी स्वर्णलतापासून विभक्त झाल्यानंतर श्रीलीलाचा जन्म झाला. त्यामुळे माझ्याशी नाव जोडणं बंद करा, अशी विनंती केली.

२०२२मध्ये श्रीलीलाने अनाथाश्रमातून दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं. गुरू आणि शोभिता असं त्यांचं नाव आहे. या दोघांना एक चांगलं जीवन देण्याचा श्रीलीलाने निर्णय घेतला. माहितीनुसार, श्रीलीलाने ‘बाय टू लव्ह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हे पाऊल उचललं. एका अहवालानुसार, श्रीलीलाची एकूण संपत्ती सुमारे १५ कोटी रुपये आहे. करिअरच्या सुरुवातीला, ती चित्रपटांसाठी प्रति तास ४ लाख मानधन घेत होती. नंतर तिचं मानधन वाढून १.५ कोटी रुपये झालं. पुढे ३ कोटी रुपयांपर्यंत गेलं. आता श्रीलीला ४ कोटी मानधन घेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 the rule fame sreeleela adopted two children all you need to know about kartik aaryans rumoured girlfriend ent disc news pps