‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर एक फोटो शेअर करत त्यांच्यातील नातं सर्वांसमोर आणलं. तर कालच त्या दोघांचा साखरपुडाही संपन्न झाला. आता त्या दोघांच्या जोडीवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वानंदी टिकेकरने तिचा रिलेशनशिप स्टेटस जाहीर करताच अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ‘इंडियन आयडॉल’ फेम लोकप्रिय गायक आशिष कुलकर्णी याच्याबरोबर ती लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आता त्यांच्या साखरपुड्याचा फोटो शेअर करत अभिनेत्री सुकन्या मोने यांनी खास प्रतिक्रिया देत त्या दोघांचं अभिनंदन केलं आहे.

आणखी वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…

स्वानंदी टिकेकर सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडीच्या त्यांची शेअर करत आहे. तिचं लग्न ठरल्याबद्दल सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच काल तिचा आणि आशिषचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच काही वेळातच ते प्रचंड व्हायरल झाले. तिचे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील तिचे मित्रमंडळी त्यावर कमेंट करत त्या दोघांना शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी स्वानंदी आणि आशिषच्या साखरपुडा दरम्यानचा एक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत लिहिलं, “गोड गोड दिसताय!! अभिनंदन…”

हेही वाचा : सुकन्या मोने गाडीतून खरोखर आख्खं स्वयंपाकघर सेटवर आणतात? स्वतः प्रतिक्रिया देत म्हणाल्या…

सुकन्या मोने यांनी शेअर केलेली ही स्टोरी आता चर्चेत आली आहे. तर आता सर्वांचं लक्ष स्वानंदी आणि आशिष यांच्या लग्नाकडे लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sukanya mone gave reaction to swanandi tikekar and ashish kulkarni engagement rnv