नागपूर : राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे. पुणे आणि मुंबईला आज “यलो अलर्ट” देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांनाही आज “यलो अलर्ट” देण्यात आला आहे. तर एक ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. तर दोन ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात “ग्रीन अलर्ट” देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नागपूर करार विदर्भावरील अन्यायाचे प्रतीक – ॲड. वामनराव चटप; विराआंस समितीने केली नागपूर कराराची होळी

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, मुंबई उपनगरासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस असेल तर काही ठिकाणी कमी प्रमाणात असेल. आज ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाने “यलो अलर्ट” जारी केला आहे. त्यासोबत रायगड आणि रत्नागिरीसाठीही पावसाचा “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur today heavy rain forecast for kolhapur ratnagiri sindhudurg yellow alert for mumbai and pune imd rgc 76 css