scorecardresearch

Premium

नागपूर करार विदर्भावरील अन्यायाचे प्रतीक – ॲड. वामनराव चटप; विराआंस समितीने केली नागपूर कराराची होळी

चंद्रपूर येथील जेटपूरा गेट येथे गांधी पुतळ्यासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात नागपूर कराराची होळी करण्यात आली.

nagpur agreement burned in chandrapur, vidarbha state movement committee, vidarbha state movement committee
विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली नागपूर कराराची होळी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

चंद्रपूर : नागपूर कराराद्वारा २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला. मात्र या सत्तर वर्षात या कराराद्वारे देण्यात आलेली आश्वासने पाळली नाही. यामुळे विदर्भात अनेक ज्वलंत समस्या निर्माण झाल्या. याचा निषेध करण्यासाठी आणि आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात नऊ स्थानांवर समिती आणि नागरिकांनी या विदर्भ कराराची होळी करून संताप व्यक्त केला. चंद्रपूर येथील जेटपूरा गेट येथे गांधी पुतळ्यासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात नागपूर कराराची होळी करण्यात आली.

येथे समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, अंकुश वाघमारे, मुन्ना आवळे, पुंडलिक गाठे, नितीन भागवत यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले. चिमूर येथे डॉ.रमेश गजबे, स्थूल सर, नागदेवते ,पंकज गायकवाड,रवि ढोले,संजय वाकडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी नागपूर कराराची होळी केली. राजुरा येथे विद्या आंदोलन समितीचे ॲड. अरुण धोटे, आरपीआय नेते सिद्धार्थ पठाडे, बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. राजेश लांजेकर यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

tomato throw on ajit pawar car
नाशिकमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर कांदे, टोमॅटोफेक
Hasan Mushriff
“भाजपाच्या मेहरबानीने पालकमंत्री…”, हसन मुश्रीफांना भाजपा नेत्याचा टोला; म्हणाले, “कोल्हापुरात संघर्ष अटळ”
case registered three people filming drone cameras ​​Air Force Base Lonavala pune
लोणावळ्यात हवाई दल तळाच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण; हैदराबादमधील तिघेजण ताब्यात
A march will be held at the house of Guardian Minister Backward Classes Commission Chairman and local MLAs in chandrapur
पालकमंत्री, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व स्थानिक आमदारांच्या घरावर तिरडी मोर्चा काढणार; ओबीसींच्या बैठकीत आंदोलन निर्णय

हेही वाचा : कुणबी समाजाचा बहिष्कार; तरीही सरकारने ओबीसींची बोलावली बैठक

गोंडपिपरी येथे रूपेश सूर, ॲड. प्रफुल आस्वले, शंकर पाल,रविंद्र हेपट यांनी नागपूर कराराची होळी केली. कोरपना येथे अरुण नवले, रमाकांत मालेकर, अविनाश मुसळे,बंडू राजुरकर यांनी नागपूर करार जाळून आंदोलन केले. जिवती येथे शब्बीर जागीरदार, सय्यद इस्माईल, विनोद पवार, देविदास वारे, उद्धव गोताबळे यांनी नागपूर कराराची होळी केली.

हेही वाचा : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…

‘विदर्भ हा नैसर्गिक दृष्ट्या संपन्न क्षेत्र असून गेल्या सत्तर वर्षात विदर्भावर सतत अन्याय झाला आहे. विदर्भातील प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळेच येथे शेतकरी आत्महत्या, कुपोषण,बेरोजगारी, सिंचन अनुशेष, नक्षलवाद, प्रदूषण, बालमृत्यू यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे नागपूर करार हे विदर्भावरील अन्यायाचे प्रतीक असल्याने आज विदर्भातील सर्व जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात या नागपूरची होळी करण्यात आली आहे’, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In chandrapur vidarbha state movement committee burns nagpur agreement demands separate vidarbha state rsj 74 css

First published on: 29-09-2023 at 11:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×