rajesh narvekar took charge as new nmmc commissioner zws 70 | Loksatta

नवी मुंबईत पारदर्शक व नियोजबद्ध काम करणार ,सुंदर शहराला अधिक गतिमान करणार ; राजेश नार्वेकर

नवी मुंबई पालिका आयुक्त  नार्वेकर यांनी पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

नवी मुंबईत पारदर्शक व नियोजबद्ध काम करणार ,सुंदर शहराला अधिक गतिमान करणार ; राजेश नार्वेकर

नवी मुंबई – नवी मुंबई हे शहर हे सुंदर असून त्याच्या सौंदर्यात अधिक भर घालून शहराला गतिमान करणार आहे.स्वच्छ सर्वेक्षणामध्ये हे शहर कायम आघाडीवर असून या शहरात स्पर्धेतील क्रमांकाबरोबरच  प्रत्यक्ष शहरात झालेला सुंदरतेचा बदल दिसून येतो. त्यामुळे हे शहर अधिक सुंदर करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेन.

जिल्हाधिकारी म्हणून काय करू नये याचे निर्बंध लावण्याचे काम केले जाते परंतु आयुक्त म्हणून काय करावे ते शहरात करून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार  असल्याचा विश्वास नवी मुंबई महापालिकेचे  आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केला. सत्ताबदलानंतर शिंदे सरकारने प्रशासनात मोठय़ा प्रमाणावर खांदेपालट केला आहे. ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. ठाणे पालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर, तर नवी मुंबई आयुक्तपदी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई पालिका आयुक्त  नार्वेकर यांनी पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवी मुंबई इंडियन स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम

संबंधित बातम्या

कामोठेमध्ये तिहेरी आत्महत्या
नवी मुंबईत पाणीचोरीला बसणार पायबंद ; मूळ गावठाण , झोपडपट्टीधारक येणार पाणीमीटरच्या कक्षेत
नवी मुंबई : पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक; तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी मंगळवारी पुणे बंद
“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान
Sania Shoaib Divorce: सानिया मिर्झा सोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएब मलिकने सोडले मौन; म्हणाला…
‘मेरा दिल ये पुकारे आजा’ फेम पाकिस्तानी तरुणीला विकायचाय तिचा हिरवा ड्रेस; किंमत आहे तब्बल….
अतिउत्साहीपणा नडला! उर्फी जावेदच्या शरीरावर जखमांच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली…