-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (१४ एप्रिल) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
-
मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.
-
सहकारातून समृद्धीच्या दृष्टीकोनातून भाजपा राष्ट्रीय सहकार धोरण आणणार.
देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार. -
७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल. ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार. तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार. जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यात येणार.
-
गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार. पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.
-
घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविणार. उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षांपर्यंत वाढविण्यात येणार
-
महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार.
३ कोटी महिलांना लखपती करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार. महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार. -
कोट्यवधी लोकांची वीजबील शून्य करण्यावर भर देण्यात येणार. मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यंत वाढवणार
-
कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार. पीएम किसान योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार. (सर्व फोटो – भाजपा/X)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा