-
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस शिल्लक आहेत. सध्या विविध नेत्यांचा प्रचारसभांचा धडाका सुरू आहे.
-
आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी पक्षांकडून विविध मतदारसंघात, अभ्यास करून प्रभावित करणारा चेहरा उमेदवार म्हणून निवडला जातो.
-
त्याच पार्श्वभमीवर आपण जाणून घेऊयात या लोकसभा निवडणुकीत सर्वात तरुण उमेदवार कोण? ठरलं आहे.
-
बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातील शांभवी चौधरी या उमेदवार, लोकसभा २०२४ च्या निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार ठरल्या आहेत.
-
चिराग पासवान यांच्या एलजेपी पक्षाने शांभवी यांना उमेदवारी दिली आहे.
-
शांभवी चौधरी या मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मंत्री अशोक चौधरी यांच्या कन्या आहेत.
-
शांभवी यांनी लेडी श्रीराम महाविद्यालय दिल्ली येथून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे तसेच समाजशास्त्र विषयात पीएचडी मिळवली आहे.
-
शांभवी या विवाहित असून त्यांचे पती शायन कुणाल आहेत. २०२२ मध्ये त्यांचे लग्न झाले असून, या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते.
-
शांभवी चौधरी यांचे वय वर्ष २५ आहे. आतापर्यंत आलेल्या उमेदवारांपैकी शांभवी या सर्वात तरुण उमेदवार ठरल्या आहेत. (Photo Source- Shambhavi Chaudhary/Facebook Page)

‘एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरेही एकत्र येऊ शकतात’, शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान