-
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वेगवेगळी वळणे घेत, आता पंचरंगी लढतीवर पोहोचली आहे.
-
हातकणंगलेत महायुतीकडून शिंवसेनेचे (शिंदे गट) खासदार धैर्यशील माने हे रिंगणात आहेत.
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी धैर्यशील मानेंना आव्हान देत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
-
तर, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची (उबाठा) उमेदवारी शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना जाहीर केली आहे.
-
वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना हातकणंगलेत उमेदवारी दिली आहे.
-
या उमेदवारांची चौरंगी लढत होणार, ही चर्चा होत असतानाच पत्रकार परिषद घेऊन इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
-
त्यामुळे हातकणंगलेमध्ये पंचरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
धेर्यशील माने विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्यामागे महायुतीची ताकद आहे.
-
तर हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांचीही ताकद मोठ्या प्रमाणावर आहे.
-
त्यामुळे ही पंचरंगी लढत मुख्यतः माने आणि शेट्टी यांच गणित बिघडवणार की इतर तीन उमेदवारांपैकी कोणी बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. हातकणंगलेमध्ये ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे.

WCL 2025: देश आधी, बाकी सगळं नंतर; टीम इंडियाने मैदान सोडल्यानंतर शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया व्हायरल- video