-
देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे शेवटचे मतदान येत्या १ जून रोजी शनिवारी पार पडणार आहे.
-
त्यामुळे आज सायंकाळपर्यंतच या टप्प्याचे प्रचारकार्य पक्षांना करता येईल.
-
लोकसभा निवडणूक २०२४ साठी सात टप्प्यामध्ये मतदानाचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला होता.
-
या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदान होणार आहे तर आज संध्याकाळी प्रचार थंडावणार आहेत.
-
देशात अखेरच्या टप्प्यामध्ये एकूण ८ राज्यात मतदान होईल.
-
बिहारमधील ८ जागा, चंडीगड १, पश्चिम बंगाल ९, पंजाब १३, हिमाचल ४, उत्तर प्रदेश १३, झारखंड आणि ओडिशातील प्रत्येकी ३ जागांवर मतदान होणार आहे.
-
एकूण ८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५७ मतदारसंघात या अखेरच्या टप्प्यात मतदान पार पडेल.
-
शेवटच्या टप्प्यानंतर देशामध्ये उत्सुकता असेल ती निकालाची.
-
येत्या बुधवारी म्हणजेच ४ जून रोजी सर्व टप्प्यातील मतदानाची मोजणी करून निकाल घोषित केला जाईल.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल