-
देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आघाडी आणि पिछाडीचे ताजे आकडे समोर येत आहेत.
-
महाराष्ट्रातील चर्चेत असलेला मविआ आणि महायुती या दोन्ही आघाड्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण मतदारसंघ असेलेला छत्रपती संभाजीनगर येथे काय घडत आहे? याबद्दल जाणून घेऊयात.
-
संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार राज्याचे मंत्री संदीपान भूमरे आहेत.
-
तर शिवसेना उबाठा म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार असलेले चंद्रकांत खैरे आहेत.
-
याशिवाय येथे विद्यमान खासदार असलेले इम्तियाज जलील एमआयएम या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
-
२०१९ मध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे हर्षवर्धन जाधव यांनीही याहिवेळेस इथून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामुळ इथे ४ उमेदवारांमध्ये लढत होत आहे.
-
त्यामुळे येथिल लढतीत कोणाला आघाडी मिळतेय तर कोण आहे पिछाडीवर यावरूनच काही वेळानंतर विजयी उमेदवार कोण असेल हे स्पष्ट होणार आहे.
-
नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी तीन हजार ३३८ मतांनी आघाडी घेतली आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघातून जलील यांना आघाडी मिळाली.
-
इम्तियाज जलील यांना १९७४५ मते मिळाली तर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना १६४०७ मते मिळाली.
-
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना ११ हजार ४२९ मते मिळाली आहेत.
-
हर्षवर्धन जाधव यांना केवळ १६७६ मते मिळाली. गेल्या निवडणुकीमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर होते. या वेळी त्यांना सर्वात कमी मिळाली. पहिल्या फेरीमध्ये ५५ हजार १८५ मते मोजली गेली आहेत. दरम्यान आघाडीवर असलेले इम्तियाज जलील यांची लीड मात्र घटली आहे, २५०० मतांनी त्यांची लीड घटली आहे. हेही पहा- PHOTOS: १८ व्या लोकसभेसाठी ५४४ मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात; कोण उधळणार विजयाचा गुलाल…

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक