-
उद्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे.
-
त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.
-
या फोटोंमध्ये ही तयारी कशी सुरू आहे ते पाहता येत आहे.
-
हे सर्व फोटो पुणे येथील आहेत.
-
या फोटोंमध्ये निवडणूक अधिकारी दिसत आहेत.
-
पुण्यातील कृषी महाविद्यालयामधून ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन मतदान केंद्रांवर अधिकारी- कर्मचारी घेऊन जात आहेत.
-
मतदानासाठी लागणारी इतर सर्व सामग्रीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हातात दिसत आहे.
-
मतदानाच्या एक दिवस आधपासून ही तयारी सुरू आहे.
-
दरम्यान, सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केलेलं आहे.
-
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
-
२० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहन सर्व राजकीय पक्षांनीही केलेलं आहे.
-
दरम्यान २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत.
-
राज्यातील २८८ मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य उद्या मतपेट्यांमध्ये कैद होणार आहे.
-
(सर्व फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”