-
बऱ्याच चर्चा आणि तर्कवितर्कांनंतर अखेर अभिनेते कमल हसन यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्याचे वृत्त समोर आलं. बुधवारी मदुराईच्या ओथाकडाई मैदानात त्यांनी जनसमुदायासमोर आपल्या नव्या पक्षाची स्थापना करत राजकीय वर्तुळात प्रवेश केला.
-
'मक्कल निधी मय्यम' नावाच्या पक्षाची घोषणा त्यांनी केली असून, या पक्षाचं चिन्हंही यावेळी सर्वांसमोर सादर करण्यात आलं.
-
यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.
-
मध्यभागी एक तारा आणि त्याभोवती एखाद्या कुंपणाप्रमाणे असणारं हातांच्या साखळीचं चक्र असं एकंदर त्यांच्या पक्षाचं चिन्हं आहे.
-
आपल्या पक्षाची स्थापना करण्यापूर्वी बुधवारी सकाळपासूनच हसन यांनी विविध ठिकाणी जात स्थानिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.
-
एक कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवल्यानंतर आता राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला तामिळनाडूच्या घराघरात पोहोचायचं आहे, असा मानस हसन यांनी उराशी बाळगला
-
आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी त्यांनी भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मूळ घरी भेट दिली. त्यानंतर त्यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादनही केले.
-
हसन यांच्या रुपात तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आता राजकीय पटलावर त्यांची चाल कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘या’ दोन हेल्थ इन्शुरन्सची Cashless Treatment सुविधा १ सप्टेंबरपासून बंद; लाखो रुग्णांना बसणार फटका