-
मुलगी, पत्नी, आई आणि अभिनेत्री अशा सर्वच भूमिकांची जबाबदारी लिलया पेलत श्रीदेवी यांनी स्वत:ला सिद्ध केलं.
-
वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी त्या आपल्यातून निघून गेल्या खरं. पण, बऱ्याच आठवणी आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्या आजही आपल्यातच वावरत असल्याचा भास अनेकांना होतो. एक अभिनेत्री म्हणून त्या जितक्या प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर यायच्या त्याचप्रमाणे एक कुटुंबवत्सल महिला म्हणूनही त्यांनी आपली भूमिका चोखपणे बजावली होती.
-
जान्हवी आणि खुशी या दोन्ही मुलींसाठी तर त्या सध्या मार्गदर्शकांची भूमिकाही बजावत होत्या.
-
श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी सध्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज असून, प्रेक्षकांना तिच्यात श्रीदेवी यांचीच छवी दिसते.
-
आपल्या मुलींसोबत श्रीदेवी यांचं एक वेगळं नातं होतं. मुलींसोबतच्या त्यांच्या नात्याला मैत्रीची सुरेख किनार असल्याचंही कित्येकदा पाहायला मिळालेलं.
-
श्रीदेवी यांच्या चित्रपट कारकिर्दीसोबतच खासगी आयुष्यही चर्चेत होतं.
-
बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध होत बॉलिवूडच्या या देखण्या अभिनेत्रीने आपला संसार थाटला होता. 'मिस्टर इंडिया' या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती असंही म्हटलं जातं.
-
रुपेरी पडद्यावर अनिल कपूर आणि 'श्री'च्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अनिल कपूर नात्याने श्रीदेवी यांचे दीर आहेत.
-
आपल्या कुटुंबाला श्रीदेवी यांनी नेहमी प्राधान्य दिलं.
-
श्रीदेवी आणि त्यांचे वडील.
-
आपल्या कुटुंबासोबत श्रीदेवी.

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”