-
'बिग बॉस १३'चे लाँचिंग नुकतेच पार पडले असून यामध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत यावरून पडदा उचलण्यात आला आहे. १३ सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात १०५ दिवस ९३ कॅमेऱ्यांच्या नजरेखाली राहणार आहेत. या स्पर्धकांची यादी खालीलप्रमाणे आहे..
-
कोईना मित्रा- मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केलेली अभिनेत्री कोईना मित्रा काही आयटम साँगमध्ये झळकली. त्याचप्रमाणे 'एक खिलाडी एक हसीना', 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत.
-
सिद्धार्थ शुक्ला- 'बालिका वधू' या मालिकेमुळे सिद्धार्थ शुक्ला घराघरात पोहोचला. सिद्धार्थने 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ' या चित्रपटात आलिया भट्ट व वरुण धवनसोबत काम केलं.
-
देवोलीना भट्टाचार्जी- ‘साथ निभाना साथीया’ या मालिकेत 'गोपी बहू'च्या भूमिकेमुळे देवोलीना प्रकाशझोतात आली.
-
रश्मी देसाई- छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मीने बिग बॉसच्या घरात येण्यासाठी सर्वाधिक मानधन घेतल्याचं समजतंय. 'उतरन' मालिकेतील 'तपस्या'च्या भूमिकेमुळे ती प्रसिद्ध झाली.
-
दिलजीत कौर- 'इस प्यार को क्या नाम दूँ?', 'कयामत की रात' या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.
-
शेहनाज गिल- शेहनाज ही अभिनेत्री व गायकसुद्धा आहे.
-
डाबू मलिक- संगीतकार अनू मलिक यांचा धाकटा भाऊ डाबू मलिक हा सलमान खानचा जवळचा मित्र आहे. डाबूने जगभरात दहा हजारांहून अधिक शो केले आहेत.
-
माहिरा शर्मा- 'यारों का टशन', 'नागिन ३', 'बेपनाह प्यार' या मालिकांमध्ये माहिराने भूमिका साकारल्या आहेत.
-
पारस छाब्रा- 'स्प्लिट्सविला'च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक पारस हा 'बढो बहू' या मालिकेतसुद्धा झळकला आहे.
-
आरती सिंग- अभिनेता-कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहिण आरती ही 'वारिस', 'उतरन' या मालिकांतील भूमिकांमुळे आरती प्रकाशझोतात आली.
-
शेफाली बग्गा- शेफाली ही पत्रकार आहे.
-
सिद्धार्थ डे- सिद्धार्थ हा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारा पहिला पटकथालेखक आहे. त्याने काही मालिकांचं पटकथालेखन केलं आहे.
-
असिम रियाझ- असिम हा प्रसिद्ध मॉडेल असून बऱ्याच जाहिरातींमध्ये तो झळकला आहे.

Israel-Iran Conflict : ‘फिजिक्स येत होतं म्हणून नाही, तर..’, इराणच्या १४ शास्त्रज्ञांच्या हत्येबद्दल इस्रायलनं स्पष्ट केली भूमका