बॉलिवूडमध्ये लग्न आणि घटस्फोट ही एक कॉमन बाब आहे. अनेक स्टार्स असे आहेत जे लग्न करतात घटस्फोटही घेतात. या कलाकारांना घटस्फोट झाल्यानंतर जोडीदारास एलिमनी म्हणजेच घटस्फोटाच्या वेळी जी देय रक्कम दिली जाते, त्या स्वरूपात त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. जाणून घ्या की, अशा अनेक स्टार्सनी किती किंमत देवू केली…. २००१ मध्ये आदित्य चोप्रा आणि पायल खन्ना लग्नबंधनात अडकले होते. २००९ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. राणी आणि आदित्य यांच्यात सुरू असलेलं अफेअर हे त्याचं वेगळं होण्याचं कारण असल्याचं बोललं जातेय. पायलने पोटगी म्हणून आदित्यकडे मोठी रक्कम मागितली होती. दोघांचा घटस्फोट झाला मात्र पोटगीची किती रक्कम दिली हे अद्याप समजले नाही. पण बॉलिवूडमधील सर्वात महागड्या घटस्फोटामधील एक असल्याचं बोललं जातेय. अरबाज आणि मलायकांनी लग्नाच्या १८ वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बांद्राच्या कोर्टात त्यांचा घटस्फोट झाला. अर्जन कपूरसोबत मलायकाची वाढलेली जवळीक या घटस्फोटाचं कारण असल्याचं बोललं जातेय. घटस्फोटानंतर अरबाज खान इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. घटस्फोटानंतर मलायकानं पोटगी म्हणून अरबाजकडे १५ कोटींची मागणी केली होती. अरबाजनेही पोटगीची रक्कम देण्यास सहमती दर्शवली. अरबाज आणि मलायकाला अरहान नावाचा मुलगा आहे. बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अधुना यांनी २०१७ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. १६ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर सामंजस्याने हे दोघे वेगळे झाले. घटस्फोटानंतर फरहानच्या दोन्ही मुलींचा ताबा अधुनाकडे असून ती दोघींचा सांभाळ करत आहे. फरहानने पोटगीच्या रक्कमेसोबतचं ब्रांद्रामधील विपसना बंगला अधुनाच्या नावावर केलाय. आमिर आणि रीनानं घरच्यांच्या विरोधात जाऊन १९८६ मध्ये विवाह केला होता. लग्नाच्या १६ वर्षांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. आमिरने रीनाला पोटगी म्हणून मोठी रक्कम दिली पण त्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती त्याने बाहेर कधी दिली नाही. हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का दिला. दोघांचं वेगळं होण्याचं कारण अद्याप समजू शकले नाही. सुझानने पोटगी म्हणून हृतिककडे ४०० कोटींची मागणी केली होती. त्यानंतर हृतिकने पोटगी म्हणून ३८० कोटी रूपये सुझानला दिले. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यात २०१४ मध्ये भांडणाला सुरूवात झाली. संजय कपूरचं वागणं यामागील कारण असल्याचं बोललं जातेय. २०१६ मध्ये अखेर दोघेही विभक्त झाले. पोटगी म्हणून खारमधील घर करिश्माच्या नावावर करण्यात आले आहे. तर मुलाच्या खर्चासाठी १४ कोटींचा बाँड केला. याचं दरमाह १० लाख रूपयांच्या आसपास व्याज मिळते. अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा घटस्फोट बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट असल्याचं म्हटले जातेय दोघांनी १९९१ साली लग्न केले होते. अमृता सैफपेक्षा १३ वर्षांने मोठी आहे. लग्नाच्या १३ वर्षानंतर दोघे वेगळे झाले. अमृताला पोटगी म्हणून किती रक्कम दिली याबद्दल सैफने कधीच माहिती दिली नाही. पण बातमीनुसार सैफने त्याच्या वाट्याची असलेली आर्धी संपत्ती अमृताला दिली आहे. १९९८ मध्ये संजय दत्तनं रिहा पिल्लाईशी लग्न केले होते. अभिनेता संजय दत्तची रिया ही दुसरी पत्नी होती. संजयच्या पहली पत्नी रिचा शर्माचं १९९६ मध्ये ब्रेन ट्युमरमुळे निधन झालं होतं. त्यानंतर संजय आणि रिहा यांच्यात प्रेम झालं. पण त्यानंतर काही वर्षामध्येच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, रिहा आणि टेनिस स्टार लियंडर स्पेस यांच्यामधील जवळीक या घटस्फोटाचं कारण होतं. असं म्हणतात की, संजयचं रिहावर खूप प्रेम होतं. दोघांचा अधिकृतपणे घटस्फोट होईपर्यंत संजय दत्तने रिहाच्या शॉपिंग आणि मोबाईल बिलांचा खर्च केला. पोटगी म्हणून संजय दत्तने रिहाला आठ कोटी रुपये आणि एक लक्झरी कारही दिली होती. संजय दत्तपासून वेगळं झाल्यानंतर रिहानं टेनिस स्टार रिहाशी संसार थाटला. पण दोघांच्या नातंही फारकाळ टिकलं नाही. रिहा आणि लियंडर यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. माध्यमांच्या वृत्तानुसार लियंडरने रिहाला पोटगीची रक्कम म्हणून चार लाख रूपये दिले. डान्सर, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभू देवा यांनी २०११ मध्ये पत्नी लतासोबत घटस्फोट घेतला. या घटस्फोटामागे प्रभूदेवाचं नयनतारासोबत असलेलं अफेअर होतं. प्रभूदेवानं पोटगी म्हणून दोन महागड्या गाड्या आणि दहा लाख रूपये दिलं होतं. पोटगीची रक्कम जवळपास २० ते २५ कोटींची असल्याचं बोललं जातेय.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…