-
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउनला आता दोन महिने होत आले आहेत. (सर्व फोटो सौजन्य – सायंतनी घोष इन्स्टाग्राम)
-
लॉकडाउन करण्यामागचा उद्देश अजून सफल झाला नसला तरी त्यामुळे लोकांचे भावनिक आणि आर्थिक नुकसान मात्र मोठया प्रमाणावर होत आहे.
-
गोरगरीब मजुरांप्रमाणे आर्थिक दृष्टया संपन्न असलेल्या कलाकारांनाही या लॉकडाउनची झळ आता बसू लागली आहे.
-
नागिन ४ फेम अभिनेत्री सायंतनी घोषने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना लॉकडाउनच्या मुद्दावर आपले मत मांडले.
-
लॉकडाउनमुळे आर्थिक दृष्टीने काय परिणाम झाला आहे ते सायंतनीने सांगितले.
-
"ऑफिसेस बंद आहेत. आम्हाला सुद्धा त्रास होतोय. माझ्या प्रकरणात माझे पेमेंट अडकले आहे. माझे स्वत:चे काही खर्च आहेत. मला घराचा, कारचा ईएमआय भरायचा आहे".
-
"सरकारने दोन-तीन महिन्यासाठी सवलत दिली असल्याने हप्ता थोडा पुढे जाईल पण मला घर सुद्धा चालवायचे आहे. मला सुद्धा आता याचा त्रास होतोय" असे सायंतनी घोषने सांगितले.
-
"रोजच्या उत्पन्नावर ज्यांच घर चालतं, जे कलाकार आता कुठे स्थिरस्थावर होतायत. अजून ते स्थिर झालेले नाहीत त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतय" असे सायंतनी म्हणाली.
-
"क्षेत्र कुठलेही असो, प्रत्येकासाठी हा कठिण काळ आहे" असे सायंतनी म्हणाली.
-
सायंतनी घोष आज इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी स्थिर असलेली अभिनेत्री आहे. तरीही तिला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय.
-
कुमकुम, नागिन, महाभारत, इतना करोना मुझे प्यार आणि नामकरन या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केले आहे.
-
२०१२ साली बिग बॉसच्या सहाव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणूनही ती सहभागी झाली होती.
-
संजीवनी २ मध्ये तिने डॉ. अंजली गुप्ताची भूमिका साकारली आहे.
-
२००२ साली सायंतनी घोष मालिकाविश्वात पदार्पण केले. पण त्याआधी तिने बंगाली चित्रपटातही अभिनय केला आहे.
-
सायंतनी घोष गेल्या १५ वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा