-
छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी.’ या मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली.
-
मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली
-
गेल्या वीस वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सोनी टीव्हीवरील 'सीआयडी' या मालिकेतील कलाकारांच खरं आयुष्य आणि त्यांच्या कुटुंबाबत जाणून घेऊयात.
-
सीआयडीमध्ये सिनियर इन्पेक्टर अभिजीत हे पात्र आदित्य श्रीवास्तव या अभिनेत्यानं साकारलं आहे. त्यांच्या पत्नीचं नाव मानसी श्रीवास्तव आहे, तसेच त्यांना आरुषी आणि अद्विका या दोन मुली आहेत, तर एक मुलगा आहे.
-
दयाचं पात्र साकारणारे दयानंद शेट्टी म्हैसूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव स्मिता शेट्टी आणि मुलीचं नाव वीवा आहे.
-
सीआयडीतील प्रमुख पात्र असलेले एसीपी प्रद्युमन अर्थात शिवाजी साटम हे ऐकेकाळी बँकेत कॅशिअर म्हणून काम करीत होते. त्यांच्या पत्नीचे नाव अरुणा आहे. या दाम्पत्याचा मुलगा अभिजीत साटम हा अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. तर सून मधुरा वेलणकर ही मराठीतीला प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स ऊर्फ फ्रेडीचं पात्र साकारणाऱ्या कलाकाराचं खरं नाव दिनेश फडणीस आहे. दिनेश हे प्रसिद्ध कॉमेडियन आणि लेखक आहेत. या फोटोत ते आपल्या आई-वडिलांसोबत दिसत आहेत.
-
इन्स्पेक्टर श्रेया बनलेली जानव्ही छेडा हीच्या पतीचं नाव निशांत गोपालिया आहे. तिला एक मुलगी देखील आहे.
-
डॉ. तरिकाचं पात्र रंगवणाऱ्या अभिनेत्रीचं नाव श्रद्धा मुसळे आहे. श्रद्धानं सन २०१२ मध्ये लखनऊचे व्यावसायिक दीपक तोमर यांच्यासोबत लग्न केलं.
-
सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर सचिनचं पात्र साकारणाऱ्या कलाकाराचं नाव ऋषिकेश पांडे असं आहे. या फोटोमध्ये ऋषिकेश आपल्या पत्नी आणि मुलासह दिसत आहेत.

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल