
'आयर्न मॅन', 'फिटनेस फ्रीक' अशा विविध नावांनी अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण ओळखला जातो. 
मिलिंदचं व्यायामासाठी, फिटनेससाठी असलेलं प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. 
सोशल मीडियावर विविध फोटो व व्हिडीओ पोस्ट करत तो व्यायाम व फिटनेसचं महत्त्व समजावून सांगत असतो. 
मिलिंदने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. 
१९८८ मध्ये मिलिंदला मॉडेलिंगची पहिली ऑफर मिळाली होती. 
मॉडेलिंग करत असतानाही मिलिंद त्याच्या फोटोशूटमुळे फार चर्चेत असायचा. 
मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतच्या या जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेकदा मिलिंदला वादविवादालाही सामोरं जावं लागलं होतं. 
१९९१ साली त्याचं गर्लफ्रेंडसोबतचं न्यूड फोटोशूट प्रकरण चांगलंच गाजलं होतं. 
१९८९ मध्ये त्याला एका जाहिरातीची पहिली ऑफर मिळाली होती. 
या जाहिरातीच्या फोटोशूटसाठी त्याला तब्बल ५० हजार रुपये मानधन मिळालं होतं. 
त्यावेळी मिलिंद २३ वर्षांचा होता. एका हॉटेलमध्ये तो काम करत होता. वेटर किंवा कूक होण्याचीही त्याची इच्छा होती. 
मिलिंदने जगातील कठीण ट्रायलॉथॉन स्पर्धांपैकी एक असणाऱ्या झुरीच येथील ट्रायलॉथॉन स्पर्धेत बाजी मारली होती. 
विशेष म्हणजे वयाच्या ५०व्या वर्षी मिलिंद सोमणने शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी ही स्पर्धा पूर्ण करून दाखविली होती. 
मिलिंदला ट्रेकिंगचीही फार आवड आहे. 
२००६ मध्ये मिलिंदने ‘वॅली ऑफ फ्लॉवर्स’ या सिनेमातील त्याची सह-कलाकार मॅलेन जाम्पनोईशी विवाह केला होता. पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांनी २००९ मध्ये घटस्फोट घेतला. 
यानंतर तो काही काळ सहाना गोस्वामी या अभिनेत्रीलाही डेट करत होता. या दोघांमधील वयातील अंतर २१ वर्षे होते. या नात्यातही मिलिंद चार वर्षे होता. 
त्यानंतर मिलिंदने अंकिता कोनवारशी लग्नगाठ बांधली. मिलिंद आणि अंकिता यांच्यामध्येही वयाचं बरंच अंतर आहे. 
वयाची पन्नाशी ओलांडलेला मिलिंद आजही तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. 
त्याचं फिटनेसविषयीचं प्रेमच तरुणींना त्याच्याकडे अधिकाधिक आकर्षित करतं. -
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, मिलिंद सोमण
पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार