बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना पहिल्याच चित्रपटानंतर फार प्रसिद्धी मिळाली. पण नंतर ते इंडस्ट्रीतून गायबच झाले. असाच एक अभिनेता म्हणजे जुगल हंसराज. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मासूम' या चित्रपटात जुगलने बालकलाकार म्हणून काम केलं. 'पापा कहते हैं' या चित्रपटात हिरो म्हणून पहिल्यांदा त्याने काम केलं. जुगल आता चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून सक्रिय नाही. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहब्ब्तें' या चित्रपटामुळे त्याला चांगली ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने एका विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. या मल्टिस्टारर चित्रपटानंतर त्याने कोणताच हिट चित्रपट दिला नाही. २००२ मध्ये त्याने 'प्यार तुम्ही से कर बैठे' या चित्रपटात भूमिका साकारली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर जुगलने खूप मोठा ब्रेक घेतला. २०१० मध्ये 'प्यार इम्पॉसिबल'मध्ये तो झळकला. हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटानंतर जुगलने अभिनय क्षेत्राला रामराम केलं. २०१४ मध्ये त्याने गर्लफ्रेंड जास्मिनशी ऑकलँडमध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला फक्त दोघांचे कुटुंबीय व मोजका मित्रपरिवार उपस्थित होता. जुगलची पत्नी जास्मिन न्यूयॉर्कमध्ये इन्वेस्टमेंट बँकर आहे. जुगल सध्या करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करतो. क्रिएटिव्ह टीममध्ये तो काम करतो. तो उत्तम लेखन करतो. करण आणि जुगल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. करणच्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या शीर्षकगीतातील ओळी जुगलने लिहिली होती. जुगल विद्या बालनच्या 'कहानी २'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटात त्याची फार छोटी भूमिका होती. माधुरी दीक्षितसोबत त्याने 'आजा नचले' चित्रपटात स्क्रीन शेअर केला होता.

नितीन गडकरींनी सरन्यायाधीश गवईंना दिला ‘आदेश’, त्यांच्याकडून लगेच मान्यही….