अली जाफरने आपल्या अभिनय आणि गायकीनं सर्वच भारतीयांची मनं जिंकली. मेरे ब्रदर की दुल्हन, किल दिल, टोटल सियापा यासारख्या चित्रपटात त्यानं अभिनय केला. उत्तम अभिनयशैली आणि संवाद कौशल्य यांच्या जोरावर फवाद खानने…. साधा आणि सहज अशा अभिनयानं फवाद खानने सर्वांचेचं मन जिंकलं. खूबसूरत चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणाऱ्या फवादने अनेक चित्रपटात काम केलं आहे. क्रीचर ३डी या चित्रपटात इम्रान अब्बासने अभिनय करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर जानिसारमध्येही अभिनय केला. मात्र, इम्रानला हवं तसं यश मिळालं नाही. -
जावेद शेखने अक्षय कुमारच्या नमस्ते लंडन आणि शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटात काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं होत.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या रईस चित्रपटाद्वारे माहिरा खानने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. या चित्रपाटमुळे माहिराला भारतात मोठी ओळख निर्माण झाली. रईस या चित्रपटामुळे ती विशेष लोकप्रिय झाली पाकिस्तानी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री मावराने २०१६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सनम तेरी कसम हा तिचा पहिला चित्रपट. या चित्रपटातील सरस्वतीच्या भूमिकेनं तिने सर्वांचं मनं जिंकलं. पाकिस्तानातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री सबा कामरानेही बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. सबाने इरफान खानसोबत हिंदी मिडियम या चित्रपटात अभिनय केला आहे. पाकिस्तानमधील टेलव्हिजनवरील प्रसिद्ध असा चेहरा सजल अलीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सजलने श्रीदेवीच्या मॉम चित्रपटात काम केलं आहे. कजरारे चित्रपटातून सारा लॉरेनने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. त्यानंतर मर्डर ३ मधील अभिनायमुळे तिची भारतात ओळख निर्माण झाली. वीना मलिकने गली गली में चोर है आणि दाल में कुछ काला है यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. त्याशिवाय बीग बॉस ४ या सत्रात ती स्पर्धक होती.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट