-
कोई मिल गया या हृतिक रोशन-प्रिती झिंटा अभिनीत चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करणारी हंसिका मोटवानी आज २९ वर्षांची झाली.
-
लॉकडाउन आणि करोनाची दहशत यामुळे तिने घरच्या घरी कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणीसोबत वाढदिवस साजरा केला.
-
हंसिकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
वाढदिवशी मी मोठ्या तोऱ्यात आणि नखऱ्यात वावरते आहे, असे एका स्टोरीला तिने कॅप्शन दिले आहे.
-
हंसिकाची आई आणि भाऊ हे वाढदिवसाच्या छोटाशा सेलिब्रेशनसाठी उपस्थित होते. त्यांच्यासोबतचा फोटो तिने शेअर केला आहे.
-
हंसिकाच्या घरात वाढदिवसाला साजेसं असं धडाकेबाज डेकोरेशन करण्यात आलं होतं. मोठ्या अक्षरात HM म्हणजेच हंसिका मोटवानी असं लिहून ठेवलं होतं. त्या अक्षरांच्या आत फुगेही भरून ठेवले होते.
-
२००१ साली एकता कपूरच्या एका मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी हंसिका २००३साली' कोई मिल गया'मध्ये बालकलाकार होती.
-
विविध डेली सोप केल्यानंतर ती आपका सुरूर चित्रपटात हिमेश रेशमियाची नायिका म्हणून दिसली. ती त्यावेळी केवळ १६ वर्षांची होती.
-
२००८चा 'मनी है तो हनी है' हा हंसिकाचा बॉलिवूडमधला शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावलं.
-
बॉलिवूडमध्ये फारशी हिट न ठरलेली हंसिका आता दक्षिणेत मात्र एक आघाडीची अभिनेत्री मानली जाते.
-
हंसिकाने आतापर्यंत विविध भाषांमध्ये मिळून एकूण ५०हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
-
सर्व फोटो – (हंसिका मोटवानी – इन्स्टाग्राम)

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…