-
अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते. पण आता सईचा साडीतला मराठमोळा थाट आणि साज असलेला लूक पाहूया. (सर्व छायाचित्र सौजन्य- सई ताम्हणकर / इन्स्टाग्राम)
-
सईने नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
साडीतील सईचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं.
-
सईचे साडीतील ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहेत.
-
निळ्या रंगाची साडी, त्यावर पारंपरिक दागिने आणि मोत्याची नथ असा सईचा मराठमोळा थाट या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय.
-
सईचा बोल्ड लूक जितका चर्चेचा विषय असतो. तितकाच हा पारंपरिक लूकदेखील चर्चेत आहे.
-
याआधीही सईने नऊवारी पैठणी साडी नेसून फोटोशूट केलं होतं.
-
सईने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. सोबतच हलकासा मेकअप आणि हेअर स्टाइलही केली आहे..
-
'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

Vedam Bold Poster: अभिनेत्रीच्या ‘मादक’ होर्डिंगमुळे झाले ४० अपघात; अखेर पोलिसांनी हटवलं ‘बोल्ड’ पोस्टर