‘घाडगे & सून’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये व अभिनेता भूषण प्रधान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. नुकताच भाग्यश्रीने तिचा वाढदिवस साजरा केला आणि तिच्या वाढदिवशी भूषणने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली. भाग्यश्रीसोबतचा फोटो पोस्ट करत भूषणने लिहिलं, 'मी किती खास आहे याची जाणीव तू मला कसं करून देते हे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत. तू जशी आहेस तशीच राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.' भूषणने दिलेल्या या शुभेच्छांवर भाग्यश्रीसुद्धा व्यक्त झाली. '..आणि तू नेहमीच माझा दिवस खास बनवतोस', अशी प्रतिक्रिया तिने दिली. याआधीही भाग्यश्री आणि भूषणच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर होत्या. भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भूषणसोबतचा फोटो पोस्ट करत मजेशीर कॅप्शन दिलं होतं. ‘असा व्यक्ती जो मला आवडतो…आमच्या मागे उभा असलेला नव्हे…’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. भाग्यश्रीने २०१७ मध्ये ‘घाडगे & सून’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेली अमृता प्रभुणेची भूमिका चांगलीच गाजली. त्यापूर्वी २०१४ मध्ये तिने ‘श्रावण क्वीन’चा किताब जिंकला होता. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती आयटी कंपनीत नोकरी करत होती. भूषणने मराठी चित्रपट, वेब सीरिज व नाटकांमध्ये काम केलंय. भूषणने काही दिवसांपूर्वीच ‘सर्वांत आकर्षक पुरुष’चा किताब जिंकला आहे. ‘आम्ही दोघी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘सतरंगी रे’, ‘मिस मॅच’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल