मालिकांमध्ये कलाकारांची रातोरात बदली होणं हे काही नवीन नाही. काही कलाकार स्वत:हून काही कारणास्तव मालिका सोडतात तर काहींना काढून टाकलं जातं. मराठीतील लोकप्रिय मालिकांमधून कोणकोणत्या कलाकारांनी मध्येच काढता पाय घेतला, ते पाहुयात.. प्राजक्ता गायकवाड- मालिकेतील सहकलाकारासोबत झालेल्या वादानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने 'आई माझी काळुबाई' ही मालिका मध्येच सोडली. या मालिकेवरून बराच वाद झाला होता. इशा केसकर- 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी इशा केसकर हिनेसुद्धा मालिका मध्येच सोडली. यावेळी इशाने काही वैयक्तिक कारणं दिली होती. किरण ढाणे- 'लागीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेत जयडीची भूमिका साकारणारी किरण हिने मध्यातच मालिका सोडली. किरणने मानधन वाढवण्याची मागणी केली होती पण ती निर्मात्यांना अमान्य होती. विद्या सावळे- 'लागीरं झालं जी' याच मालिकेत मामीची भूमिका साकारणाऱ्या विद्या यांनीसुद्धा मानधनाच्या वादामुळे मालिका सोडली. उर्मिला निंबाळकर- 'दुहेरी' या मालिकेत मैथिलीची प्रमुख भूमिका साकारणारी उर्मिला हिने मालिका का सोडली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तिच्या जागी सुपर्णा श्याम या अभिनेत्रीला प्रमुख भूमिकेसाठी घेण्यात आलं. संजय मोने- 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेच्या शीर्षकगीताचं शूटिंग संजय मोनेंसोबत केलं होतं. मात्र जेव्हा मालिका प्रसारित झाली तेव्हा त्यांच्या जागी गौतम जोगळेकर पाहायला मिळाले. या अचानक बदलाचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शिवानी सुर्वे- 'देवयानी' या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी शिवानी हिने मालिका मध्यातच सोडली. शूटिंग शेड्युलवरून निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर शिवानीने ही मालिका सोडली होती. दिपाली पानसरे- 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी दिपाली हिने करोनाच्या पार्श्वभूमीवर मालिका मध्येच सोडली. करोनाचा प्रादुर्भाव असताना शूटिंग करण्याची रिस्क नको, असं सांगत तिने मालिका सोडली. रवी पटवर्धन- 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत आजोबांची भूमिका साकारणारे रवी पटवर्धन हे करोनाच्या प्रादुर्भावामुळे मालिकेपासून दूर झाले. त्यांनी अद्यापही मालिकेत पुन्हा एण्ट्री केलेली नाही. वंदना गुप्ते- 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेतील दुर्गा मॅडम म्हणून आधी वंदना गुप्ते होत्या. मात्र नंतर त्यांची जागा अभिनेत्री आशा शेलार यांनी घेतली.

Kundmala Bridge Collapse : इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळला; दुर्घटनेत २ मृत, ६ गंभीर, ३८ जणांना वाचवण्यात यश…