-
इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी ही तिच्या अभिनयाबरोबरच सोशल नेटवर्किंगवरील फोटोंमुळेही कायम चर्चेत असते. मात्र जेव्हापासून तिचं नाव अरबाज खानसोबत जोडलं गेलं आह तेव्हापासून तिच्याबद्दलच्या अगदी साध्या साध्या गोष्टींही पेज थ्रीवर चर्चेचा विषय ठरत असल्याचं चित्र दिसत आहे.
-
अरबाज आणि जॉर्जियामधील नात्यासंदर्भातील बातम्या अनेक वृत्तपत्रांमधील पेज थ्रीवर छापून आल्या आहेत. हे दोघे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत.
-
पहिली पत्नी मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज आणि जॉर्जियाच्या लग्नाच्याही अफवा अनेकदा ऐकायला आल्या होत्या. या दोघांचं लग्न अद्याप झालेलं नाही.
-
सध्या या दोघांचा कोणताही चित्रपट इतक्यात प्रदर्शित होणार नसला तरी जॉर्जिया चर्चेत आहे ती तिने सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केलेले फोटो आणि तिच्या पायावरील टॅटूमुळे.
-
इन्स्ताग्रामवर जॉर्जियाचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती या अकाऊंटवरुन सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि वेगवेगळे फोटो शेअर करताना दिसते.
-
काही दिवसांपूर्वीच जॉर्जियाने आपले चार नवीन फोटो इन्स्ताग्रामवरुन शेअर केले.
-
या फोटोंमध्ये जॉर्जिया एकदम गॅमरस लूकमध्ये दिसत असून ती खुर्चीवर बसलेली आहे.
-
जॉर्जियाच्या या फोटोंना हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. फोटो पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दहा हजारांहून अधिक जणांनी हे फोटो लाइक केले होते.
-
जॉर्जियाच्या शेकडो चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट करुन तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
-
जॉर्जियाने शेअर केलेल्या फोटोंवरील कमेंट सेक्शनमध्ये तिच्या पायावरील टॅटूवर अनेकांनी भाष्य केल्याचं दिसत आहे. जॉर्जियाच्या पायावर गाठ मारलेल्या रेड रिबीनचा टॅटू आहे.
-
अर्थात अशाप्रकारे जॉर्जियाच्या शरीरावरील टॅटूवर चाहत्यांनी कमेंट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
-
यापूर्वीही अनेकदा तिने पोस्ट केलेल्या शॉर्ट कपड्यांमधील फोटोंमध्ये जेव्हा जेव्हा तिच्या पायावरील हा रेड रिबीनचा टॅटू चाहत्यांच्या निदर्शनास आला आहे त्यांनी कमेंटमध्ये त्याबद्दल भाष्य केलं आहे.
-
जॉर्जियाने पोस्ट केलेल्या अनेक फोटोंमध्ये हा टॅटू दिसतो आणि त्यानंतर तिचे चाहते या टॅटूबद्दल कमेंट करतानाचे चित्र कमेंट सेक्शनमध्ये पहायला मिळते.
-
जॉर्जियाने काही दिवसांपूर्वीच अरबाजसोबत लग्नासंदर्भातील अफवांवर आपली भूमिका मांडली होती.
-
मला अफवांचा फारसा फडत नाही. आम्ही आमचं नातं कोणापासून लपवलेलं नाहीय, असं जॉर्जियाने लग्नासंदर्भातील म्हटलं आहे.
-
तुमचं नाव एखाद्या लोकप्रिय व्यक्तीसोबत जोडलं जातं तेव्हा तुमच्याबद्दल चर्चा होणं सहाजिक असतं असंही जॉर्जियाने म्हटलं आहे. (सर्व फोटो साभार: Instagram/giorgia.andriani22)

RCB vs PBKS IPL Final: आरसीबीने १८ वर्षांनी अखेरीस आयपीएल ट्रॉफीवर कोरलं नाव, विराट कोहलीच्या डोळ्यात अश्रू