साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. आताच्या काळात डिझायनर साडय़ांनाही महत्त्व आलं असलं तरीही पारंपरिक साडय़ांचा दिमाख काही औरच. स्त्रीचं सौंदर्य खुलवण्यासाठी तयार झालेल्या सर्वात प्राचीन पोशाखांमधला साडी हा एक पोशाख समजला जातो. स्त्रियांच्या पोशाखातला हाच सर्वात डौलदार आणि आरामदायी पोशाख ठरावा. अगदी आधुनिक जगातही साडीचं आकर्षण कायम आहे. सध्याच्या फॅशनच्या काळातही साडी सर्वात किफायतशीर आणि आरामदायी पोशाख आहे. कामाच्या ठिकाणी, सहज म्हणून किंवा खास प्रसंगी वापरण्यासाठी उत्तम आहे. साडीला भारतीय स्त्रियांचा वैशिष्टय़पूर्ण पोशाख म्हणून मान्यता मिळून शतके लोटली असली, तरीही सर्व वयाच्या आणि सर्व अभिरुचीच्या स्त्रियांना शोभून दिसणाऱ्या या पोशाखाचा दिमाख जराही कमी झालेला नाही. मराठी चित्रपटांमध्येही 'लिंबू कलरची साडी' ते 'माहेरची साडी' अशा विविध रुपात साडी अधोरेखित करण्यात आली. -
भारतीय पेहरावांपैकी सर्वात सुंदर पेहरावातली एक साडी मानलं जातं.
-
-
भारतीय संस्कृतीची ओळख असलेली ही साडी शालिनतेत सौंदर्यवती ठरते.
-
हजारो वर्षांत जगभर वस्त्र संस्कृतीत अनेक बदल झालेत, तरीही या स्पर्धेत तग धरून आहे ती साडीच!
-
साडीचा प्राचीन इतिहास जसा समृद्ध व कलावंतांचा आहे, तसाच वर्तमानही रसिकांचा आहे. काळाच्या ओघात या रसिक मनानेच साडीच्या रूपात अनेक बदल घडवून आणले.
-
सर्व छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश