-
पंजाबी अभिनेत्री पारुल गुलाटी (Parul Gulati) सध्या तिचा आवड्या छंदामध्ये म्हणजेच भटकंतीत व्यस्त आहे.
-
मागील काही दिवसांपासून पारुल मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये भटकतेय.
-
पारुलने आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या भटकंतीदरम्यानचे काही फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
या चर्चेचं कारण म्हणजे पारुलने थेट जगातील सात अश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताजमहलपासून ते राजस्थानच्या करौली सिटी पॅलेसपर्यंत अनेक ठिकाणांना भेट दिलीय.
-
ताजमहल आणि करौली सिटी पॅलेसमधील अनेक फोटो तिने स्वत:च्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेत.
-
या फोटोंमध्ये अगदी ताजमहालच्या जवळ पारुल वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
-
ताज समोरील पारुलच्या या फोटोंना एक लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केलं आहे.
-
वाह ताज अशी कॅप्शन पारुलने या फोटोंना दिलीय.
-
कमेंट्समध्येही अनेकजण पारुलचं कौतुक करत आहेत. अनेकांनी हार्ट तसेच फायर इमोन्जीच्या माध्यमातून पारुल या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत असल्याचं म्हटलं आहे.
-
पारुलने राजस्थानच्या करौली सिटी पॅलेसमधील काही सुंदर फोटोही शेअर केलेत.
-
करौली सिटी पॅलेस हा ७०० वर्ष जुना राजवाडा असून तो अत्यंत सुंदर आहे. मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात सुंदर इमारतींपैकी ही एक आहे असं पारुलने या राजवाड्याचं वर्णन करताना म्हटलं आहे.
-
हा आळस देताना फोटो शेअर करताना पारुलने, "रोज सकाळी मला या ठिकाणी अशापद्धतीने झोपेतून उठायला नक्कीच आवडेल", लिहिलं आहे.
-
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येही काही दिवसांपूर्वी पारुलने चांगलीच भटकंती केल्याचे तिच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन दिसून येतं.
-
ग्वाल्हेरमधील तानसेन स्मारकासमोर काढलेला हा फोटोही पारुलने आठवडाभरापूर्वी शेअर केलाय.
-
पारुलला भटकंतीची खूप आवड आहे.
-
अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी भटकायला गेल्यानंतर पारुल आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.
-
पारुलने शेअर केलेल्या फोटोंमधील काही हे खूपच बोल्ड असतात.
-
अनेकदा पारुल ही स्विमिंग पूलमधील फोटोही शेअर करते.
-
पारुलच्या याच अदांवर तिचे अनेक चाहते कायमच फिदा होताना दिसतात.
-
पारुलचे इन्स्ताग्रमावर ९ लाख ८६ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो: instagram/gulati06 वरुन साभार)

“थँक यू इंडिया”, चीनचा भारतीय नौदलाला सलाम; कारण ऐकून अभिमान वाटेल