-
अभिनेता टायगर श्रॉफ आज त्याचा 31वा वाढदिवस साजरा करतोय. बॉलिवूडमध्ये उत्तम डान्सर आणि अॅक्शन हिरो अशी टायगरने स्वत: वेगळी ओळख निर्माण केलीय. टायगरच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या लहानपणाचे काही खास फोटो.
-
अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या कुटुंबाला खुप महत्व देतो. कामा व्यतिरिक्त कुटुंबासोबत वेळ घालवणं त्याला आवडतं.तर टायगरची आई आयशा श्रॉफ यादेखील कायम टायगर आणि त्याची बहिण कृष्णा या दोन्ही मुलांसोबत मजा मस्ती करताना दिसून येतात.
-
आयशा श्रॉफदेखील सोशल मीडियावर चांगल्याचं सक्रिय आहेत. बऱ्याचदा त्या टायगरच्या लहानपणीचे फोटो पोस्ट करत असतात. तसंच कुटुंबाचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसून येतात.
-
बॉलिवूडमध्ये टायगर या नावाने अनेकांची मनं जिकणाऱ्या टायगरसाठी त्याची आई खुप जवळची आहे. आयशा श्रॉफ टायगरला लाडाने गोंडा म्हणतात. त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या टायगरच्या बालपणाच्या फोटोत त्यांनी कॅप्शनमध्ये अनेक ठिकाणी त्याला 'माझा लाडका गोंडा' असं म्हंटलं आहे.
-
लहानपणी देखील टायगर दिलायला खुपचं सुंदर होता. आईसोबतच तो वडिल जॅकी श्रॉफ यांचादेखील लाडका आहे.
-
आयशा श्रॉफ यानी टायगरचे लहानपणीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिलीय. (photo credit- instagram@ayeshashroff)

Daily Horoscope: श्रावणाची सुरुवात ‘या’ तीन राशींना देणार भरघोस लाभ; कोण संकटमुक्त तर कोणाच्या कुंडलीत पडणार पैशांचा पाऊस? वाचा राशिभविष्य